Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक, उमेदवारांच्या खर्च तपासणी होणार

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक, उमेदवारांच्या खर्च तपासणी होणार

               पंढरपूर (कटूसत्य वृत्त):  विधानसभा पोट निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च निवडणूक खर्च शाखेत सादर करणे बंधनकारक असते.  निवडणूक काळात उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरिक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांच्याकडून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी  गजानन गुरव यांनी दिली.

              पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी  उमेदवारांनी केलेला खर्च तपासणी  दिनांक  ६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून येणार आहे. तसेच दुसरी खर्च तपासणी  दिनांक  १० एप्रिल २०२१ रोजी  व तिसरी खर्च तपासणी दिनांक  १५ एप्रिल २०२१ रोजी  सकाळी दहा वाजलेपासून  शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

              उमेदवारांनी निवडणूक काळात केलेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी  खर्चाची नोंदवही, निवडणुकीसाठी अद्यावतअसलेले खाते पासबुकची छायाकिंत प्रत व आवश्यक कागपत्रांसह स्वत: किंवा प्रतिनिधींनी  संबंधित तारखांना वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments