Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व सर्व सुविधा असलेले 100 बेडचे शासकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी : सतीश सावंत

कोरोना बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व सर्व सुविधा असलेले 100 बेडचे शासकीय रुग्णालय सुरू करण्याची मागणी : सतीश सावंत  

          सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला शहरासह तालुक्यातील गोरगरीब कोरणा बाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व सर्व अत्यावश्यक सुविधा असलेले 100 बीडचे शासकीय रुग्णालय तसेच सांगोला तालुक्यासाठी 108 नंबर चा नवीन तीन सुसज्ज शासकीय रुग्णवाहिका सुरू करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्याकडे नगरसेवक सतीश सावंत यांनी केली. 

          सांगोला तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असून मृत्यूदर देखील अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्या कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी आवश्यक सेवा सुविधा या मिळेनाशा झाल्या आहेत. 

          अनेक वेळा रुग्णांची अवस्था ही चिंताजनक झाल्यावर त्यास पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.  परंतु खाजगी रुग्णालयातील बिल हे लाखोंच्या आकड्यात निघत असल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार परवडत नाहीत आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा रुग्णांना मृत्यूचे याची वेळ आल्याचे चित्र गंभीर याने दिसत आहे सांगोला  तालुक्यात यासाठी शासनाकडून व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व इतर अत्यावश्यक सुविधा करणारे 100  बेडचे शासकीय हॉस्पिटल सुरू करण्यात यावे तसेच ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन व सर्व सुविधा असलेले  रुग्णालय सुरु करावे. 

          तसेच तालुक्यासाठी सध्या 108 नंबर ची रुग्णवाहिका 1च  उपलब्ध असल्याने सदरची रुग्णवाहिका ही कोरोना काळातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी कमी पडत असल्याने तालुक्यातील वाढती कोरोना ची गंभीर बाब लक्षात घेऊन तालुक्यासाठी 108   नंबर चा नवीन 3 सुसज्ज रुग्णवाहिका शासनाकडून मंजूर करून लवकरात लवकर मंजूर करून घ्याव्यात 108  चा रुग्णवाहिका सुरू झाल्याने लोकांचे प्राण वाचण्यास व एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्यास मोठी मदत होईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्याकडे सुरू करण्याची मागणी नगरसेवक सतीश सावंत यांनी केली. 

Reactions

Post a Comment

0 Comments