Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्तुत्वान कार्याचा ठसा उमटवणार्‍या शितलदेवी मोहिते-पाटील

 कर्तुत्वान कार्याचा ठसा उमटवणार्‍या शितलदेवी मोहिते-पाटील

अकलूज (कटुसत्य वृत्त )  :- अंगी कर्तुत्व आणि विविध असे कौतुकास्पद कलागून असूनही कित्येक महिला संसाराच्या ओझ्याखाली दबल्या जातात. वाट्याला आलेले दुःख त्याला गवसणी घालत आनंदाचा मुक्त श्वास घेण्यासाठी धडपडत असतात. अशा रणरागिणी गृहिणींच्या जीवनाला आणि त्यांच्या जगण्याला नवी कलाटणी देण्यासाठी, नवी दिशा प्राप्त करून देण्यासाठी तर त्यांच्यामध्ये धाडस, जिद्द आणि चैतन्याचा वणवा निर्माण करण्यासाठी शीतलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी मुलगी वाचवण्यासाठी... मुलगी शिकवण्यासाठी तर महिला सबलीकरणासाठी शिवरत्न फाउंडेशन व डॉटर मॉम फाउंडेशनची स्थापना केली. आणि या फौंडेशनच्या माध्यमातून मुलगी वाचवा... मुलगी शिकवा या अभियानाची चळवळ हाती घेऊन त्यांनी कर्तुत्वान कार्याचा कहर करीत गगनभरारी घेतली. त्यांच्या या कार्याचा प्रवास झांबिया आफ्रिका पर्यंत जाऊन पोहोचला.
             अफाट निर्णयक्षमता, सुसंस्कृत राजकारणी, कल्पक विचारसरणी, नम्रता, संयम, वैचारिक बुद्धिमत्ता, उत्कृष्ट स्मरणशक्ती, उत्कृष्ट विचारसरणी, समदृष्टीपणा, संवादाची हातोटी आणि जनविकासबद्दलची असणारी आत्मीयता अशा विविध गुणांमुळे व गुणवैशिष्ट्यांमुळे शितलदेवी मोहिते पाटील यांच्या सानिध्यात प्रचंड प्रमाणात महिलावर्ग येऊ लागला‌. पती धैर्यशील मोहिते-पाटील यांची मिळत असलेली अनमोल साथ सार्थक ठरली. शितलदेवी मोहिते-पाटील यांनी राबवलेले मुलगी वाचवा... मुलगी शिकवा हे अभियान कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरले. तसेच त्यांचे महिला सबलीकरण कार्यातही अतुलनीय योगदान आहे. यामध्ये त्यांनी महिलांसाठी विविध शिबिरे, विविध सांस्कृतिक उपक्रमे, विविध स्पर्धा, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले‌. तर अकलूजच्या इतिहासात प्रथमच त्यांनी ताराराणी महिला कुस्ती केंद्राची स्थापना केली. आज या कुस्ती केंद्रातील मुली कुस्तीमध्ये अग्रेसर ठरत आहेत.
        शितलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिवरत्न फाउंडेशन व डॉटर मॉम फाऊंडेशनच्या माध्यमातून अभूतपूर्व कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्या आज सर्वत्र आदराचे आणि कौतुकाचे स्थान ठरल्या आहेत.त्यांनी हाती घेतलेले कार्य मर्यादित राहिले नसून दिल्ली, आग्रा, राजस्थान, हरियाणा, याचबरोबर झांबिया, आफ्रिका मध्ये पोहोचले आहे. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अशा या कर्तृत्ववान रणरागिणीस जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Reactions

Post a Comment

0 Comments