Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात पालकमंत्री शेतरस्ते/पाणंद रस्ते अभियान प्रभाविपणे राबवणार...

 जिल्ह्यात पालकमंत्री शेतरस्ते/पाणंद रस्ते अभियान प्रभाविपणे राबवणार  - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



पुणे (कटूसत्य वृत्त) :- पुणे जिल्ह्यात सर्व तालुक्यात पाणंद रस्ते योजना अतिशय प्रभावीपणे राबविण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.  

            जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी या योजनेमध्ये आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.  जिल्ह्यात आत्तापर्यंत 931 रस्ते निश्चित करण्यात आले असून या रस्त्यांची लांबी १ हजार २२९ कि मी. आहे. सर्व तालुक्यांमध्ये १०५ रस्त्यांची कामे लोकसहभागातून सुरु केली असून यामध्ये १४६ कि. मी. चे रस्ते खुले होणार आहेत. यापैकी 69 कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. पुणे जिल्ह्यात 1 हजार 483 गावे असून सर्व ग्रामपंचायतीकडून या गावांमध्ये किती रस्ते शेत रस्ते/पाणंद रस्ते खुले करणे आवश्यक आहे. यासाठीचे प्रस्ताव सर्व ग्रामपंचायती कडून ३१ मार्च पूर्वी घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सर्व उपविभागीय अधिका-यांना दिले. जिल्हयात जवळजवळ १ हजार २०० ते १ हजार ५०० रस्ते या योजनेतून खुले करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेमधून केवळ पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त न करता त्या रस्त्यांचे मजबूतीकरण देखील करण्यात येणार आहे. विविध योजनेच्या अभिसरणामधून या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. निधी उपलब्ध असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून या सर्व रस्त्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना या रस्त्यांची अंदाजपत्रके युध्दपातळीवर करणे, त्यांच्या प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. नरेगामधून आत्तापर्यंत १०५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.  

            १ एप्रिल २०२१ या आर्थिक वर्षापासून उर्वरीत कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. एप्रिल/ मे मध्ये या कामांना मोठया प्रमाणावर सुरुवात करुन जास्तीत जास्त शेतक-यांना याचा लाभ होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (रजा राखीव) संजय तेली यांनी सांगितले.

            तालुकानिहाय झालेले काम सोबतच्या प्रपत्रामध्ये दर्शविलेले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments