Hot Posts

6/recent/ticker-posts

....या दोन आमदारांच्या गप्पांची जिल्हाभर चर्चा.

 ....या दोन आमदारांच्या गप्पांची जिल्हाभर चर्चा.

मोडनिंब (कटुसत्य वृत्त ) :-  एकेकाळचे घनिष्ट मित्र, काही राजकीय घडामोडीनंतर  दुरावलेले दोन आमदार  एखाद्या कार्यक्रमात एकत्र आले तर एकमेकांकडे पाहात देखील नव्हते मात्र या दोन आमदारांनी आज एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
माढा तालुक्यातील  अरण येथे ग्रंथमित्र आणि प्राचार्य हरिदास रणदिवे  यांच्या मुलाच्या लग्नाला या दोन्ही आमदारांनी आज हजेरी लावली.
लग्न समारंभाला उपस्थित असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजीराजे कांबळे एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारत होते दरम्यान आमदार  संजय मामा शिंदे  हे येताच  माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी  उठून  संजय मामांना बसण्याची विनंती केली  आणि चक्क  आमदार रणजित दादा आणि आमदार संजय मामा यांनी  अर्धा तास मनसोक्त गप्पा मारल्या. याबाबतचा फोटो  जिल्हाभर व्हायरल होतो आहे.  हा योग म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाला टर्निंग पॉईंट ठरणारा असेल अशी चर्चा दोन दिवसापासून रंगू लागली आहे. यावेळी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भारतमा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संजय मामा शिंदे चक्क शिवाजी कांबळे यांच्या बंगल्यावर .....इतर वेळेस एकमेकांचे तोंडही न पाहणारे आमदार संजय मामा शिंदे आणि शिवाजी कांबळे हे दोन दोस्त रविवारी एकत्र होते. आमदार संजय मामा शिंदे यांनी माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चहापान घेतले. यावेळी श्री कांबळे यांनी मानाचा फेटा बांधून संजय मामा शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी करमाळा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी राहुल कोळेकर, ॲडव्होकेट विजय शिंदे, दत्ता भाऊ गवळी (कुर्डूवाडी) भाऊ शिंदे गुरुजी, रमेश परबत, महादेव घाडगे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments