मोडनिंब (कटुसत्य वृत्त ) :- आपण म्हणतो सध्या तरुणाई बिघडली आहे कामातून गेली आहे मात्र या बाबीला तरुणांनी फाटा देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अस्थिविसर्जन हे नदीमध्ये केले जाते. किंवा नद्यांचा जिथे संगम आहे त्या ठिकाणी विसर्जन करण्यात येते. 90 टक्के पेक्षा जास्त प्रमाण हे अस्थी विसर्जन पाण्यामध्ये करून प्रदूषण वाढवण्याचे काम समाजाकडून केले जाते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडाचीवाडी आणि मोडनिंब येथील तरुणांनी याबाबतीत समाजासमोर आदर्श उभा केला आहे. माजी सैनिक बळीराम नामदेव सावंत यांच्या पत्नी आशा बळीराम सावंत (वय65) यांचे मंगळवार (ता. 23) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले यावेळी अस्थींचे विसर्जन करण्यासंदर्भात जेष्ठ नागरिकांनी तसेच नातेवाईकांनी अस्थिविसर्जन नदी मधेच करूया असा निर्णय घेतला होता. हॉटेल व्यावसायिक सोमनाथ निंबाळकर, शिरीष निंबाळकर, कपिल निंबाळकर, मोहन माने, पानपट्टी व्यावसायिक योगेश माने, प्रकाश माने, बालाजी माने आणि औदुंबर माने यांनी एकत्र येत नातेवाईक आणि ज्येष्ठ नागरिकांचे मत ऐकून घेतले आणि अस्थींचे चे विसर्जन न करता घराजवळच अस्थी विसर्जनाच्या मदतीने वृक्षारोपण केले. आशा सावंत यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments