Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर-मंगळवेढा रोडवर अनवली येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

 पंढरपूर-मंगळवेढा रोडवर अनवली येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

पंढरपूर  (कटुसत्य वृत्त ) :-  पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील निरा भाटघरच्या कॅनॉलमधील (पानतास नळी ते हरिजन फाटा व जगताप फाटा) येथील कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आलेली असल्यामुळे व अतिवृष्टीमुळे कॅनॉल खराब झाल्यामुळे उन्हाळी हंगामातील पाण्याची पातळी शेतकऱ्यास मिळण्यास अडचणीचे झालेले आहे. याबाबत निरा भाटघर पंढरपूर विभागाचे उपअभियंता यांना निवेदनाद्वारे युवक कॉंग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांनी मागणी केली होती व दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास पंढरपूर - मंगळवेढा रोडवरती अनवली चौकामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता त्याप्रमाणे आज मंगळवार दिनांक 2 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. याची दखल घेत तात्काळ निरा भाटघर पंढरपूर विभागाचे उपअभियंता नागराज ताटी  हे थेट आंदोलनस्थळी आले व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लक्षात घेवून त्याबाबत त्यांना लेखी आश्वासन देवून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, माजी सरपंच सुनिल वाघमारे, किरण घोडके, गोरख ताड यांनी आंदोलनस्थळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करून निरा भाटघरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर निरा भाटघरच्या अधिकाऱ्यांनी आजपासूनच कॅनॉलमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल असे लेखी पत्र दिले. 
यावेळी सिध्दनाथ भोसले, सुनिल वाघमारे, गजेंद्र शिंदे, संजय माळी, दिगंबर भोसले, संजय पाटील, आप्पा पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, संदिप मुटकुळे, भाऊसोा घोडके, ज्ञानेश्वर खुणे, रूबाब शेख, पोलीस पाटील तौफिक शेख, नागनाथ खुणे, सत्यवान भोसले, दिपक पाटील, रामभाऊ भोसले, हणमंत भोसले, बाळू घोडके, भगवान मेटकरी, बाळू भोसले, नितीन भोसले, अमोल भोसले, सारंग माळी, शिवाजी शेंडे, संभाजी भोसले, गणेश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय मोरे, पो.ना.माळी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments