सांगोला तालुक्यातील वीज जोडणी आ. शहाजी पाटील यांच्या सूचनेनंतर झाली चालू
सांगोला ( कटुसत्य वृत्त ) :- पुराचा तडाका कोरोना महामारी शेतमालाचे गडगडलेले दर या संकटाचा शेतकरी सामना करत असून यातच शेतीपंपाची वीजबिल वसुली सक्तीने करण्याकरिता शेतीपंपाचा वीज पुरवडा खंडीत केल्याने सांगोला विधानसभा मतदार संघतील बळीराजा पूर्णपणे हताश झाला होता यंदा पावसाळा देखील चांगला झाल्याने पाणी भरपूर आहे परंतु शेतकरी वीजे अभावी पिकांना पाणी देऊ शकत नाही
शेतकऱ्यांकडे कृषीपंपाची असलेली थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेत शिवारात जाऊन वीज कनेक्शन तोडणीची कारवाई करत आहे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी थांबवून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी मतदार संघातील शेतकऱ्यांनी आ. शहाजी पाटील यांच्या कडे मागणी केली होती
या मागणीची गांभीर्याने दखल घेत आ. शहाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळासह महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यालय पंढरपूर येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकऱ्यासमवेत काल तातडीची बैठक घेऊन या बैठकीमध्ये प्रति जोडणी 1hp साठी 1हजार प्रमाणे बिलातील रक्कम 22 मार्च पर्यत महावितरण कडे शेतकऱ्यांकडून भरून घेऊन सर्व वीज कनेक्शन पूर्वरत सुरु करण्याच्या सूचना आ. शहाजी पाटील यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या त्यावर सबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 1hp ला 1हजार प्रमाणे वीज बिल भरून घेण्याचे मान्य केले
या बैठीकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी. पंढरपूर विभागाचे उप अभियंता कासार व सांगोल्याचे उप अभियंता पवार यांच्या सह शिवसेना जिह्वा संभाजी शिंदे ता प्रमुख सूर्यकांत घाडगे , शेला गोडसे बाबुराव गायकवाड तानाजी पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देऊन वीज पुरवठा पूर्वरत करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आ. शहाजी पाटील यांचे सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना कडून आभार व्यक्त केले जात आहेत.
0 Comments