ज्योती क्रांती परिषदचे युवा शिलेदार तन्वीर शेख यांना प्रभाग 15 मधून उमेदवारीची चांगली संधी
प्रभाग 15 मधील जनसंपर्कामुळे तन्वीर यांची उमेदवारी चर्चेत

मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ शहरांमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजकीय क्षेत्रात एन्ट्री केल्यावर खर्या अर्थाने मोहोळ शहरात विकासाची पहाट उगवली. प्रभाग 7 मधून यापूर्वी इच्छुक असलेले बांधकाम क्षेत्रातील प्रथितयश युवा उद्योजक तन्वीर शेख यांनी प्रभाग क्रमांक १५ मधुन निवडणूक लढविण्याची राजकीय चाचपणी सुरू करताच अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तन्वीर शेख हे गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम क्षेत्रात नावाजलेले उद्योजक आहेत. ते गेली अनेक वर्ष जरी राजकीय क्षेत्रात सक्रिय नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे निकटचे संबंध होते. गत नगर परिषद निवडणुकीत त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न देखील केला होता. मात्र बांधकाम क्षेत्राच्या व्यापामुळे त्यांनी पाच वर्ष राजकीय क्षेत्रापासून काहीशी विश्रांती घेतली. असे असले तरी शहरातील अनेक प्रभागात त्यांचा बांधकाम क्षेत्रामुळे दांडगा जनसंपर्क राहिला आहे त्यामुळे तन्वीर शेख यांनी राजकीय क्षेत्रात दमदार एंट्री करून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या समर्थकांची सुरुवातीपासून ची इच्छा होती याबाबत त्यांनी तन्वीर शेख यांनी त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा करून मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्याशी तन्वीर शेख यांचे पॉलिटिकल ट्युनिंग उत्तम असल्यामुळे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. तन्वीर शेख यांच्यासारखा अभ्यासु युवा उद्योजक राजकीय क्षेत्रात असावा त्यामुळे त्यांनीदेखील तन्वीर शेख यांच्या राजकीय पदार्पणाला खंबीर पाठिंबा व्यक्त केला. शहराच्या पूर्व भागात सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ज्योती क्रांती परिषदेच्या वाटचालीमध्ये तन्वीर शेख यांचे देखील योगदान महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे रमेश बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुचर्चित तिसऱ्या आघाडीच्या घोषणेनंतर ज्योती क्रांती परिषदेचे हे युवा शिलेदार नक्कीच प्रभाव 15 मधुन बाजी मारणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांतून व्यक्त केला जात आहे.
प्रथितयश युवा उद्योजक तन्वीर शेख यांनी आपल्या सध्या वास्तव्यास असलेल्या प्रभाग 7 मध्ये ज्योती क्रांती परिषदेच्या शाखेचे धुमधडाक्यात उदघाटन गत महिन्यात केल्याने शेख यांची दमदार राजकीय एन्ट्री शहरभर गाजली. मात्र आरक्षण सोडतीमध्ये त्यांचा प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना या प्रभागातून निवडणूक लढवण्यास मर्यादा आल्या. मात्र तरीही तन्वीर शेख यांनी शहरातील विविध क्षेत्रात असलेला जनसंपर्क जराही कमी होऊ दिला नाही. सध्या प्रभाग 15 हा ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी तन्वीर शेख यांना आली आहे. या प्रभागात गेल्या दहा वर्षापासून तन्वीर शेख यांचा बांधकाम क्षेत्रामुळे दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे या प्रभागातील शेकडो नागरिकांनी शेख यांना प्रत्यक्ष भेटून आपण या प्रभागातून निवडणूक लढवावी अशी विनंती केली त्यामुळे तन्वीर शेख यांना तिसऱ्या आघाडीतून या प्रभागातून नक्कीच उमेदवारीची संधी मिळू शकते.
0 Comments