Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्याला जनावराच्या उपचारासाठी फिरता दवाखाना द्या . नागेश वनकळसे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली मागणी.

 मोहोळ तालुक्याला जनावराच्या उपचारासाठी फिरता दवाखाना द्या . नागेश वनकळसे
दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली मागणी.



मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात असून शेती पाठोपाठ दुग्ध व्यवसाय हा जोड धंदा आहे,  महाराष्ट्र शसनाकडून मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना सुरू करण्यात आली आहे. फिरत्या पशु दवाखाण्याचा लाभ  मोहोळ तालुक्यातील पशु पालकांना मिळावा यासाठी शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी महाराष्ट्राचे पशु संवर्धन मंत्री नामदार सुनील केदार यांना निवेदन दिले.                            
                 याबाबत सविस्तर बोलताना नागेश वनकळसे म्हणाले की,शेतकरी हा आपल्या पशु धनावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत असतो या पशुधनाची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून फिरता दवाखाना मोहोळ तालुक्याला ही मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास मंत्री ना. सुनील केदार साहेबांना यांना विनंती केली त्यावर मे महिन्यानंतर नंतर दुसऱ्या टप्यात मोहोळ साठी दुसऱ्या टप्यात फिरता दवाखाना देण्याचे त्यांनी मान्य केले असल्याचे श्री नागेश वनकळसे म्हणाले. 
                  याबाबत आपली भावना व्यक्त करताना नागेश वनकळसे म्हणाले की,फिरता दवाखाना मागण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पशुधनाच्या तुलनेत मोहोळ तालुक्यात कमी जनावरांचे दवाखाने आहेत आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशु पालन आणि दुग्ध व्यवसाय याकडे पाहिले जाते, आणि मोहोळ तालुक्यात तुलनेने वैद्यकीय दवाखाने कमी आहेत ,पशुधनास औषध उपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया इत्यादी बाबी  पशुसंवर्धन विभागामार्फत वरील आरोग्य सेवा नियमित पुरवल्या जातात, परंतु पशुधन आजारी पडल्यास पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जावे लागते त्यासाठी पशुपालकांना वाहनाची सोय स्वखर्चाने करावी लागते बहुतांशी शेतकऱ्यांना आर्थिक भार परवडणारा नसतो त्यामुळे अनेकदा पशुवैद्यकीय सेवेअभावी पशु धनाचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते म्हणून फिरत्या दवाखान्याची मागणी करण्यात आसल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments