Hot Posts

6/recent/ticker-posts

65 एकर येथील कोविड केअर सेंटरची प्रांताधिकारी यांनी केली पाहणी

 65  एकर येथील कोविड केअर सेंटरची  प्रांताधिकारी यांनी केली पाहणी

 पंढरपूर (कटुसत्य वृत्त ) :- तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 65 एकर येथील  कोविड केअर सेंटरच्या सुविधांची प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट देवून पाहणी केली.

        कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गुरव यांनी घेतली तसेच. तेथील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी यांच्याशी आवश्यक सुविधा, औषध साठा आदी बाबत माहिती घेवून संवाद साधला.  तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून शंकाचे  निरसन केले.  तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधेबाबत समाधान व्यक्त केले.

       यावेळी त्यांच्यासमवेत  तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकरस अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments