UPSC Civil Service 2020 उमेदवारांना आणखी एक संधी नाहीच, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!
नवी दिल्ली ( वृत्त सेवा ):- सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गेल्यावर्षी परीक्षा न देऊ शकल्यामुळे आणखी एक संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळली.
ज्या विद्यार्थ्यांना 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी शेवटची संधी होती, मात्र त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा देता आली नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर, इंदू मल्होत्रा आणि अजय रस्तोगी यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु होती. 9 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय आजच्या सुनावणीत देण्यात आला. केंद्राने हे देखील स्पष्ट केलं होतं की उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात येईल मात्र वयामध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही.
लवकरच सिव्हिल सर्व्हिस 2021 चं नोटिफिकेशन निघणार
UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग येत्या 27 जून रोजी प्रिलिम्स परीक्षा (पूर्व परीक्षा) घेणार आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलं, “CSE-2021आणि IFoSE-2021 यासाठी लवकरच पुढील अधिसूचना काढली आहे. तसंच सिव्हिल सेवा परीक्षा 2021 (CSE 2021) आणि भारतीय वन सेवा परीक्षा (IFoSE 2021) या दोन्ही परिक्षांचं एकसाथ आयोजन केलं जाईल. यावर्षी UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षेसाठी लेहमध्ये एका नव्या परीक्षा केंद्राचं ओपनिंग केलं आहे.
0 Comments