जर खासदारांची कामे होत नसतील तर जनतेची कामे कसे होत असतील? रोहन सुरवसे पाटील
अकलूज ( कटूसत्य वृत्त ) : - पुणे महापालिकेत भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे काम होत नसल्याचा आश्चर्यकारक प्रकार नुकताच समोर आला असून, जर का विद्यमान खासदारांची कामे पालिकेत होत नसतील तर सामान्य, सर्वसामान्य, जनतेची कामे कसे होत असतील असा प्रश्न स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. शिवाय भाजपचे खासदार असून भाजपाच्या शंभर नगरसेवकांची फोज पुणे महापालिकेत आहे. खासदार गिरीश बापट यांना मानणाऱ्या नगरसेवकांचीही कमकरता नाही. असे असताना खासदार गिरीश बापट यांच्या खासदार निधीतून सुचवलेल्या कामांच्या आड गतिरोधक आला आहे आणि विशेष म्हणजे ज्या पालिकेत भाजपची एक हाती सत्ता असताना देखील त्यांच्याच विद्यमान खासदार यांचे काम होत नसेल तर गोरगरिबांची कामे, विकासाची कामे, लोकहिताची कामे, कसे होत असतील?हे पडलेले कोडे आहे. त्वरित या प्रकाराकडे पालकमंत्री अजित दादांनी लक्ष केंद्रित करून सदरच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
0 Comments