Hot Posts

6/recent/ticker-posts

जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्य कौतुकास्पद. - आ.शिंदे

 जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्य कौतुकास्पद. - आ.शिंदे

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- जय मल्हार क्रांती संघटना चे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत माढा तालुक्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी बोलताना सांगितले.या संघटनेतील अर्थात रामोशी समाजाचे कार्य आणि त्यांची एकजूट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आ. बबनराव शिंदे यांनी दिली. दरम्यान जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे यांच्या हस्ते रामोशी बेरड समाजातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

  वेणेगाव तालुका माढा येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये रामोशी बेरड समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच अशा जिल्ह्यातील ६५ सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
 तसेच वेणेगाव मधील गुणवंतांचा ही सन्मान जय मल्हार संघटना आणि महात्मा फुले प्रतिष्ठान वेणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. यामध्ये महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक श्री महादेव पवार, वेणेगाव ग्रामपंचायतीमधील उत्कृष्ट कार्याबद्दल शकुंतला माने (पवार) ग्रामसेविका, उजेडाचे मानकरी भारत बावळे, नीट परीक्षेत प्राविण्य मिळवणारी अपर्णा बोराटे, गणित विषयात इयत्ता दहावी ला १००पैकी१०० गुण मिळवणारे तृप्ती कुटे व ओम किरण क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
 यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, बंडू नाना ढवळे, शिवाजी पाटील, संजय पाटील, वैभव कुटे, विजयकुमार कोठारी, राजू सोंग, नागनाथ शिरसागर, किरण कदम, राजाभाऊ शिंदे, सदा भाऊ शिंदे उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments