सर्व पक्ष तयारीला लागले भाजपमध्ये अद्याप सामसूमच
गतवेळी जिंकलेल्या दोन जागाही टिकवण्याचे कार्यकर्त्यांसमोर आव्हान
गतवेळी भाजपाकडून विजयी झालेले गाढवे यांना पक्षात ठेवण्यामध्ये संजय अण्णा क्षीरसागर यांना पुरते अपयश आले. नंतरच्या काळात गाढवे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षश्रेष्ठी राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी या प्रभागावर लक्ष केंद्रित करून कोट्यवधी रुपयांचा निधी या प्रभागाला दिला त्यामुळे या प्रभागाचा चेहरामोहरा राष्ट्रवादीने बदलल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे आता या प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी या प्रभागातील राष्ट्रवादीने आपली ताकद पणाला लावल्याचे जाणवत आहे. सध्या हा प्रभात केवळ नावापुरताच भाजपच्या ताब्यात असल्याचे जाणवत आहे. या प्रभागातून भाजपा कडून कोणाला उमेदवारी द्यायची याचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना जरी असले तरी या निर्णय प्रक्रियेमध्ये क्षीरसागर परिवाराची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्ष आणि कार्यकर्ते दोन्हीकडे समन्वय असणाऱ्या उमेदवाराला भाजपाचे तिकीट मिळणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
प्रभाग 16 चे नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी सुभाष बापू देशमुख यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत प्रभागाचा चेहरामोहरा बदलला. मात्र भाजप सत्तेत असताना देखील या प्रभागातील मतदारांसाठी देखील भाजपाच्या सत्ता कालावधीत किमान या प्रभागातील भाजप मतदारासाठी तर काही प्रमाणात नीधी देणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने प्रभागातील जनता भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.त्यामुळे आता या प्रभागातील नाराजी भाजप पक्षश्रेष्ठी कशी काढणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे मात्र या प्रभागातून राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार देऊन हा प्रभाग खेचून घेऊ शकते.
चौकट
गत निवडणुकीला संपूर्ण शहरात पॅनल लढवलेल्या भाजपला केवळ दोनच प्रभागात गुंतवून ठेवून संपूर्ण शहरात आपली ताकद निर्माण करण्याचा राष्ट्रवादी व सेनेचा डाव आहे. गत निवडणुकीवेळी भाजपला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपचे दिग्गज पदाधिकारी यांना देखील या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीत स्वबळावर पॅनल निर्मिती करण्यापेक्षा इतर पक्षातील बंडखोरांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करून पक्षाची ताकद मोठी भासवण्याचा आडाखा चाणाक्ष भाजप नेते बांधत असल्याचे चर्चा आहे. मोहोळ शहरातील भाजप आणि ग्रामीण भागातील भाजप यांच्या समन्वयाअभावी या नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षीयांना आव्हान कसे द्यायचे हा मोठा जटिल प्रश्न जिल्हा भाजप श्रेष्ठीं समोर आहे. तर काही दिग्गज म्हणवून घेणाऱ्या भाजप नेत्यांना पॅनल निर्मितीपेक्षा स्वतः कोणत्या सुरक्षित प्रभागात निवडणूक लढवून नगरपरिषद जाऊ शकतो याची काळजी लागल्याने आघाडी निर्मितीच्या तयारीत ते सर्वात पुढे असल्याचे जाणवत आहे.
0 Comments