पहिल्या टप्प्यात सर्व पत्रकारांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी - रविप्रकाश साबळे

सांगोला तालुका बहुद्देशीय पत्रकार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन सादर
सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोरोनाच्या महामारीत सरकारच्या वतीने अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या पहिल्या टप्प्यात कोरोनाची लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावुन जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा मात्र जाणीवपूर्वक विसर पडला आहे. तरी सरकारने राज्यातील सर्वच पत्रकारांना कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी करून लसीकरणात सामावून घ्यावे अशी मागणी सांगोला तालुका बहुद्देशीय पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त प्रांत अधिकारी मा. अंकित यांना देण्यात आले.
काल सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त प्रांत अधिकारी मा. अंकित साहेब यांना देण्यात आले यावेळी तहसीलदार अभिजित पाटील हे उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रविप्रकाश साबळे यांनी कोरोना काळात पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाची माहिती जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी संघटनेची मागणी रास्त असून वरिष्ठांना कळवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
कोरोणाच्या महामारी ने संपूर्ण जगभरात हाहाकार उडवून दिला असताना मागील 2020 साल संपूर्ण जगासाठी एक कलंक ठेवून गेले. या वर्षी संपूर्ण जगाची मोठी पिछेहाट झाली. यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याची मोठी हानी झाली. आपल्या भारत देशात लॉकडाऊन यशस्वी करून कोरोणावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. जे रुग्ण कोरोना ग्रस्त निघाले त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा मोठ्या परिश्रमाने काम करत होती. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा व आवश्यक त्या शासकीय यंत्रणा काम करत होत्या. यामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधवांनी मोठ्या हिमतीने जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले. कोणाच्या काळात माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व नेमकं सत्य लोकांसमोर मांडून त्यांच्यात जागृती करण्यासाठी पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. संपूर्ण देश शांत असताना पत्रकार मात्र आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर दिवस-रात्र माहिती घेऊन ती सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याचा काम करत होता.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून त्यावर गुणकारी लस तयार झाली आहे. त्या लसीचे लसीकरण सर्वप्रथम आरोग्य, शासकीय कर्मचारी व पोलीस यंत्रणा यासह अत्यावश्यक सेवेमध्ये आपले कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु या अत्यावश्यक सेवेत पत्रकारांच्या बाबतीत मात्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच सांगोला तालुका बहुउद्देशीय पत्रकार संघटनेच्या जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त प्रांताधिकारी अंकित साहेब व तहसीलदार अभिजीत पाटील यांना निवेदन देऊन पत्रकारांना सुद्धा पहिल्या टप्प्यात कोरोणाचे लसीकरण व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविप्रकाश साबळे, सचिव ॲड.रोहित सोनवणे, उपाध्यक्ष निसार तांबोळी, खजिनदार सुरज लवटे, सहसचिव महादेव पारसे यांच्यासह सचिन भुसे, मिर्झागालिब मुजावर आदी संघटनेचे पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Comments