नूतन आमदारांचा सत्कार सर्व पक्षांनी केला! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 8, 2021

नूतन आमदारांचा सत्कार सर्व पक्षांनी केला!

नूतन आमदारांचा सत्कार सर्व पक्षांनी केला!

          सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले आ. अरुण अण्णा लाड हे सोलापूर येथे आभार दौर्यावर आले होते. त्यावेळी सोलापूर शहर महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार केला. 

          याप्रसंगी आ. संजय शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष भारत जाधव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश  वाले, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, गटनेते किसन जाधव, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान व इतर मित्र पक्षांचे प्रमुख नेते एम.आय.एम.चे गटनेते रियाज खैरादी, तौफिक शेख, अजित बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडम आदी तसेच राष्ट्रवादीचे सेवा दल शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष निशांत सावळे, पदवीधर विभाग शहराध्यक्ष डॉ.राहुल मांजरे, सोशल  मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे भटक्या विमुक्त जाती विभाग शहराध्यक्ष रुपेश भोसले, पर्यावरण विभाग शहर अध्यक्ष सोमनाथ शिंदे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष प्रमोद भोसले, अमीर शेख, तनवीर गुलजार, बसवराज कोळी, शिवराज विभुते, चेतन गायकवाड, अमोल कुलकर्णी, किशोर चव्हाण, रमिझ कारभारी, अहमद महसूलदार, नसीमा शेतसंदि, लता फुटाणे गौरा कोरे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या आभार व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले होते. आभार दौरा कार्यक्रमानंतर आमदार व पक्ष पदाधिकारी यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेचे प्रमुख  मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद पार पडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages