Hot Posts

6/recent/ticker-posts

नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या शुभहस्ते शहरातील आठवडा बाजार येथील सुमारे 1 कोटी 84 लाख रूपयांच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

 नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या शुभहस्ते शहरातील आठवडा बाजार येथील सुमारे 1 कोटी 84 लाख रूपयांच्या कामाचे भूमीपूजन संपन्न




सांगोला (कटुसत्य वृत्त) :- सांगोला शहरामधील आठवडा बाजाराचे नूतनीकरण करण्याचे काम लवकरच सुरू होत असून या कामांचे भूमीपूजन समारंभ काल लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कोरोना रोगासंबंधीचे सर्व नियम पाळून व सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आला.
सांगोला शहरामध्ये आठवडा बाजार परिसर याठिकाणी 14 वा वित्त आयोग कार्यक्रम अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम तीन टप्प्यांमध्ये असून सुमारे 1 कोटी 84 लाख रूपयांचा निधी यासाठी खर्ची होणार आहे. यामध्ये आठवडा बाजार येथे नवीन पत्राशेड व कट्टे बांधणे- रक्कम 71 लाख 71 हजार 479 रू, आठवडा बाजार येथील ओटे दुरूस्ती, पेव्हींग ब्लॉक बसविणे व गटार बांधणे- रक्कम 69 लाख 37 हजार 367 रू, आठवडा बाजार कंपाऊंड वॉल बांधणे व मटण मार्केट विकसित करणे- रक्कम 43 लाख 59 हजार 161 रू असे एकूण तीन कामे या 14 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत होणार आहेत. 
सदर कामाच्या भूमीपूजन समारंभ प्रसंगी बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे, पाणीपुरवठा सभापती सौ. शोभाकाकी घोंगडे, आरोग्य सभापती रफिकभाई तांबोळी, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अनुराधा खडतरे, महायुती गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने, आघाडी गटनेते तथा नगरसेवक सचिन लोखंडे, नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक गजानन बनकर, नगरसेवक अस्मिर तांबोळी, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेविका सौ. रंजनाताई बनसोडे, नगरसेवक जुबेर मुजावर, नगरसेवक सोमेश यावलकर, मा.नगरसेवक माऊली तेली, मा. नगरसेवक सोमनाथ गुळमिरे, मा. नगरसेवक गजानन भाकरे, आनंद घोंगडे, राजू मगर, बाबूराव खंदारे यांच्यासह ठेकेदार व इतर नागरिक उपस्थित होते.
चौकट- 
1) सदरच्या आठवडा बाजार मधील कामामुळे नागरिकांची तसेच शेतकरी, व्यापारी यांची बैठकव्यवस्थेची चांगली सोय होणार आहे, सदरचे काम हे शहरातील एक चांगले व शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारे विकास काम असल्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार.
- सौ. राणीताई माने, लोकनियुक्त नगराध्यक्षा
2) मुख्यमंत्री यांच्या कोरोना रोग संसर्गाच्या निर्देशांमुळे नेतेमंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकली नसल्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमांचे भूमीपूजन सामाजिक अंतर राखून करण्यात आले. 

Reactions

Post a Comment

0 Comments