मोहोळ येथे विद्यार्थी सेना यांच्या वतीने शिवजयंती सोहळा व पदग्रहण समारंभ
मोहोळ (कटुसत्य वृत्त):- शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना मोहोळ शहर मोहोळ तालुका आणि बार्शी तालुक्याच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ सुखसागर हॉल मोहोळ येथे शिवजयंती दिनी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाला बार्शीचे उमेश घोलप, शिवसेनेचे मोहोळ तालुका प्रमुख अशोक भोसले, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख लहुजी गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, युवासेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शिवसेना युवा नेते नागेश वनकळसे सर, शिवसेना मोहोळ शहर प्रमुख विक्रम देशमुख, अमर कांबळे, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर ग्रामीण जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे गेल्या तीन वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा अहवाल मांडला आणि यापुढे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून व गणेश दादा वानकर यांच्या नेतत्वाखाली मोहोळ शहर तालुका बार्शी शहर तालुक्यामध्ये विद्यार्थी सेनेच्या कामाचे स्वरूप मांडले आणि शिवसेना वरिष्ठ नेत्यांना अपेक्षित असे कार्य करू अशी ग्वाही दिली. बार्शीचे उमेश घोलप यांनी त्यांच्या यशाचे गमक तसेच त्यांचे आतापर्यंतच्या जीवनातील सर्व अनुभव सांगितले. त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष सगळ्यांसमोर प्रकट केला. जीवनात यशस्वी होताना कष्ट आणि मेहनत महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हर्षल देशमुख यांच्या कार्याची त्यांनी विशेष असे कौतुक केले. युवासेना ग्रामीण जिल्हाप्रमुख महेश देशमुख बोलताना म्हणाले की, भारतीय विद्यार्थी सेनेतून एक चांगली युवा फळी निर्माण होत आहे. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील याकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. भारतीय विद्यार्थी सेने कडून मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. शिवसेना युवा नेते नागेश वनकळसे असे बोलताना म्हणाले की, भारतीय विद्यार्थी सेना मोहोळ तालुक्याकडून विद्यार्थ्यांच्या बऱ्याच अडचणी समस्या सुटलेल्या आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम गेल्या जवळपास दोन वर्षापासून हर्षल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. यापुढेही त्यांनी आपल्या कार्याचा वसा असाच कायम ठेवावा.शिवसेना मोहोळ शहर प्रमुख विक्रम देशमुख म्हणाले की, मोहोळ शहरातील जे विद्यार्थी स्पर्धापरीक्षांची तयारी करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी उमेश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी सेनेमुळे महाराष्ट्रात बरेच नेतृत्व घडले आहे. विद्यार्थी सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात.शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहर प्रमुख तुषार आवताडे यांनी विद्यार्थी सेनेचे कार्य कसे करावे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा दूर कराव्यात याबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि हर्षल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहर तालुका आणि बार्शी तालुका यामध्ये विद्यार्थी सेनेची होत असलेली वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
या पदाधिकारी नवनियुक्त समारंभाला शिवसेनेचे युवा नेते विजय दादा गायकवाड, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रोहित अक्कलकोटे, जिल्हा सहसचिव शिवरत्न माने, शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहर प्रमुख तुषार आवताडे, उपशहर प्रमुख करण लांबतुरे, अमोल लवटे, उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख अक्षय गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरज जम्मा, उपजिल्हाप्रमुख प्रशांत होनमाने, समाधान वाघमोडे, तालुका सचिव प्रकाश केवटे, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब वाघमोडे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत होनमाने यांनी केले.यावेळी
नूतन तालुका प्रमुख दादाराजे बेलदर, शरप्रमुख तेजस माळवदकर, उपतालुका प्रमुख आशुतोष मूळे, बार्शी तालुका प्रमुख महादेव कोकरे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग घोलप, उपशहरप्रमुख गणेश शेंडगे, विजय महाडिक,अक्षय भोसले, भाऊसाहेब कदम, बाळासाहेब विरपे, नितीन हांडे, अरविंद बामनकर, निखिल माने, काशिनाथ काळे, आझर मुलांणी, अण्णा हंडे, किरण वाघमोडे, समाधान कस्तुरे, केदार कोरे, हनुमंत लिगाडे, आबासाहेब बंडगर, परमेश्वर निळे, पंकज नरुटे, रोहित शेटे ,श्रीकृष्ण सुतार, नवनाथ कोरे, गोटू शेख, प्रशांत जाधव, गणेश गोडसे, योगेश माळी पप्पु कुर्डे , समाधान वाघमोडे , सुदन गायकवाड ,आकाश पवार , गणेश पवार, बबलू सावंत, गणेश पवार, आकाश थिटे, योगेश चोरमुले, निखिल जानकर, पवन दाईंगडे, नागेश जानकर, गिरीष भोसले, शुभम आतकरे, भोलेनाथ लामगुंडे ,विश्वनाथ लामगुंडे ,सुरज आतकरे,समर्थ आतकरे,रुत्वीक सावंत,केतन आतकरे,लक्ष्मण आतकरे, लक्ष्मण लोहार,सौरभ आतकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments