Hot Posts

6/recent/ticker-posts

नाझरे येथील शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षांमध्ये आमदार शहाजी बापुंच्या उपस्थितीत प्रवेश

नाझरे येथील शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षांमध्ये आमदार शहाजी बापुंच्या उपस्थितीत प्रवेश

          सांगोला (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यात व सांगोला तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू आहे. त्यात तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींचा समावेश असून नाझरे महत्वाचे गाव असून गावातील शेकापच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शेकाप पक्षाला खिंडार पडले आहे.

          ग्रामपंचायत निवडणूकीत दरवर्षी तेच तेच उमेदवार बदल नाही, परिवर्तन नाही, विकास गावचा नाही, याला कंटाळून वार्ड क्रमांक चारच्या शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेऊन गावाच्या  विकासासाठी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व प्रवेश केला. प्रवेश करणार्‍यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्या शारदाबाई किसन वाघमारे, किसन धोंडीबा वाघमारे, संतोष पांडुरंग वाघमारे, उमेश किसन वाघमारे, आकाश वामन सकट, उत्तम वसंत साठे, बाळू भिकू वाघमारे, तात्यासो किसन वाघमारे, समाधान किसन वाघमारे, मोहन वसंत वाघमारे, हनुमंत सुखदेव वाघमारे, अशोक दयानंद खिलारे,अर्चना वाघमारे, रूपाली तात्यासो वाघमारे यांनी पॅनल प्रमुख शिवसेना नेते दादासो वाघमोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या वेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून सर्वांचा मानसन्मान राखला जाईल, असे  सांगितले.

          शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रमुख यांनी वार्ड क्रमांक चार मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले. यावेळी सुरेश चौगुले,दादासो खरात, बापू भोसले जगन्नाथ भोसले, उत्तम भोसले, धर्मा भोसले मोहन वाघमारे, धनाजी कांबळे, भारत वाघमारे, सागर भोसले, कोंडीबा वाघमारे, राजू खरात,तानाजी कांबळे, अजय सरगर, नितीन गडदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेत शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने चैतन्य निर्माण झाले असून शिवसेनेच्या ताकद वाढली आहे. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखणे सोपे झाले असून सर्वांना उर्मी मिळाल्याचे दादा वाघमोडे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments