Ads

Ads Area

..तर वार्डातील विकासच विकल्यासारखा आहे?

 ..तर वार्डातील विकासच विकल्यासारखा आहे?

          अकलूज (विलास गायकवाड) : आशिया खंडातील महाशक्तिशाली अशा अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान प्रभाग क्रमांक तीन मधील संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे स्पर्धक उमेदवाराने स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी वार्डात पैशांचे वाटप केले असल्याची चर्चा अकलूजच्या पंचक्रोशीत सुरू आहे. तर अकलूजच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असून सदर वार्डातील विकासच विकल्यासारखा आहे? असेही सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.

          नुकत्याच राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत गावच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि गावचे राजकारण प्रभावित करणारी व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत निवडणुक असते.याला पक्षीय दृष्टिकोनाचा कोणताही रंग अथवा गंध नसतो. अर्थात ही निवडणूक स्थानिक विकास प्रश्नावर आणि समस्यांच्या अनुषंगाने लढवली जाते. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात बुद्धिचातुर्याने सहकार चळवळीत अफाट आविष्कार घडवणारे अष्टपैलू नेतृत्व सहकार महर्षी शंकरराव  मोहिते-पाटील यांचा वारसा लाभलेले अकलूज हे गाव आहे. 1922 साली स्थापन झालेल्या अकलूज ग्रामपंचायतीची लौकिकता आशिया खंडात तग धरून आहे. आणि याचे सर्वात मोठे श्रेय हे मोहिते पाटील घराण्याकडे जाते.अकलूज ग्रामपंचायतीच्या सभागृहातून राज्याच्या राजकारणात मातब्बर नेते घडले आहेत. अकलूज ग्रामपंचायत सरपंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री अशा राजकीय प्रवासाचे मानकरी ठरलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज गावातूनच राज्याच्या राजकारणात कर्तृत्ववान कार्याचा ठसा उमटवला आहे. तसे विविध मंत्रिपदेही त्यांच्या वाट्याला आलेत आणि हे घडले ते विकासाच्या जोरावर आणि जनमतांच्या आधारावर!

          अकलूजच्या इतिहासात निवडणूक कोणतीही असो "तुम मुझे वोट दो, मै तुम्हे नोट दुंगा" अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. राज्याच्या राजकीय पटलावर कर्तबगार घराणे म्हणून मोहिते पाटील यांना ओळखले जाते.सहकार महर्षी यांच्या विचारांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय असून त्यांनी अकलूजच्या नागरिकांना कधी पैशाचे आमिष दाखवले नाही. दाखवले ते विकासाचे खरे रूप! राजकारण, समाजकारण, सहकार, कला, क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रावरती त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या राजकीय अस्तित्वातील काही अपवाद वगळता, त्यांनी कित्येक निवडणुका  विकासकामांच्या जोरावर गाजवून बाजी मारली आहे. असे असताना त्यांच्या घराण्यातील संग्रामसिंह मोहिते पाटील या  व्यक्तिमत्त्वाला निवडणुकीमध्ये आलेले अपयश हे समोरील स्पर्धक उमेदवाराने केलेली आर्थिकत्येची देवान आणि मतांची घेवान हे कारणीभूत असल्याचे मत राजकीय जाणकार मांडत आहेत. हे तमाम अकलूजकर यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या दृष्टीने विध्वंसकारी म्हणावे लागेल. या निवडणुकीत घडलेल्या कृतीची दाहकता भविष्यात वाढू लागली तर विकासाला मुकावे लागेल.! आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुका अर्थकारणाच्या चक्राभवती फिरतील.?

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close