Ads

Ads Area

महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 2 फेब्रुवारी 2021 रोजी

 महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 2 फेब्रुवारी 2021 रोजी

            मुंबई (कटूसत्य वृत्त):  महाराष्ट्र शासनवित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/प्र.क्र .6/ अर्थोपाय दि. 28  जानेवारी 2011 अनुसार 8.50 % महाराष्ट्र शासन कर्ज रोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि. 1 फेब्रुवारी  2021 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 2  फेब्रुवारी, 2021 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल.

            परक्राम्य संलेख अधिनियम, 1881" अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 2 फेब्रुवारी, 2021 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24 (2) व 24 (3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बॅकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप - कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास / त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडेत्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या / इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.50 % महाराष्ट्र शासन  कर्जरोखे, 2021 च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांनारक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोवितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात / उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करीलअशी माहिती वित्त विभागाच्या 2 जानेवारी  2021 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close