Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाकरी एव्हढेच महत्व पुस्तकांना दिले : डॉ.आबासाहेब देशमुख

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाकरी एव्हढेच महत्व पुस्तकांना दिले : डॉ.आबासाहेब देशमुख

अकलूज (कटूसत्य. वृत्त.): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचनकौशल्य अफाट होते. दैनंदिन गरजेमध्ये त्यांनी भाकरी एव्डढेच महत्व पुस्तकांनाही दिले. म्हणुन आजही डॉ.आंबेडकर यांनी विद्यार्थी काळात केलेला वाचनाचा विक्रम कोणाला पुर्ण करता आलेला नाही असे मत शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ सोलापुर संलग्नीत शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज राज्यशास्त्र विभाग आणि सामजिक शास्त्रे विभाग यांचे विद्यमाने आयोजित महापूरुषाची विचारधारा राष्ट्रीय ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात ते बोलत होते.

डॉ.देशमुख म्हणाले, डॉ.आंबेडकर यांनी घेतलेले शिक्षण, त्यातून मिळालेली विद्वता त्यांनी आपल्या देशासाठी, समाजासाठी वापरली. म्हणुनच त्यांना जग महामानव म्हणते. या देशात बाबासाहेबांनी विविध प्रकारची कामे सुरु केली. केवळ घटना परिषद किंवा मसुदा समितिमधे काम केले असे नाही तर समजजीवनातल्या हजारो प्रश्नांना त्यांनी सोडविन्याचा प्रयत्न केला. ते केवळ अष्टपैलू नाहीत तर हजारो पैलू त्यांच्याकडे होते. गर्भवती महिलांना रजा, कामगार यांच्या कामाचे 8 तास या गोष्टी बाबासाहेब यांनी सुरु करण्याचा आग्रह धरला असेही ते म्हणाले.

या व्याख्यानासाठी सिंहगड इन्स्टिट्युटचे प्राचार्य आणि विद्यापीठ अधिष्टाता शंकर नवले, समाजशात्र अधिष्टाता डॉ.सिद्राम सलवदे यांचे सह प्राद्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यकमांचे प्रास्ताविक डॉ.केशव मोरे, सातारा यांनी केले तर आभार प्रा.दादासाहेब कोकाटे यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ.विश्वनाथ आवड यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments