शासकीय कार्यालयासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी सन 2021 वर्षात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
यामध्ये 14 जानेवारी 2021 रोजी मकरसंक्रात, 20 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी आणि 07 ऑक्टोबर 2021 रोजी घटस्थापनेनिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयासह शासकीय कोषागारे बंद राहतील.
0 Comments