पोलिस व जनतेच्या प्रयत्नाने वळसंग पोलीस ठाणेत साकारतेय अक्सिपार्क


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जनतेमध्ये पोलिस ठाण्याबद्दल असलेला गैरसमज दूर व्हावा पोलीस ठाणे लोकाभिमुख व्हावे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय हे चांगल्या व स्वच्छ वातावरणामध्ये असावेत, परिसर स्वच्छ व सुंदर असलेच परिणाम पोलीस अंमलदार यांच्या कार्यशैलीवर पडत असतो. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे परिसर ग्रीन व स्वच्छ असावा या सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ऑक्सिपार्क संकल्पनेला साद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून वळसंग पोलीस स्टेशनच्या आवारात ऑक्सीजन पार्क साकारले आहे.
येथील पोलिस ठाण्याच्या आवारात मागील महिन्यापर्यंत जप्त केलेल्या चार चाकी वाहने आस्थव्यस्थ पडलेली दिसत होती,मोटरसायकली अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, आवारात झाडेझुडपे वेडीवाकडी वाढली होती. पोलीस ठानेस 2 हेक्टर 93 आर इतकी मोठी जमीन असताना तिची दुरवस्था झालेली होती या सर्वांवर एक स्वच्छतेचा हात फिरवणे गरजेचे होते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना वळसंग पोलीस ठानेचा चार्ज घेताना नवीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वच्छता बाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या आवारात पाचशे मीटर लांबीचे ट्रॅक तयार करण्यात आले आज मा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकोट डॉ. संतोष गायकवाड यांच्या उपस्थितीत सभोवती 70 ऑक्सिजन निर्माण करणारे झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी इन्स्पायर फाउंडेशन माढा येथील अजय शहा यांनी मदत केली आहे.
हुतात्मा जलसंवर्धन समिती व ब्राइट अकॅडमी यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. सदर ऑक्सिपार्क बनविण्यामध्ये वळसांगचे मुस्तक शेख,कुंभरीचे सचिन झगडघंटे यांनी व संपूर्ण पोलीस ठाणेचे अंमलदार यांचा सहभाग होता, त्यामध्ये पो. हवालदार बिराजदार, श्रीनिवास दासरी, पोलीस नाईक अमोल यादव, शहजन शेख, शरद चव्हाण, काळजे यांनी विशेष मेहनत घेतली. आज पासून या ऑक्सिपार्कचा लाभ वळसंग गावातील महिला, जेष्ठ नागरिक यांना मिळणार असलेचे पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केले.
0 Comments