अशोक कामटे संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

सांगोला : शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सांगोला बार असोशियनचे माजी अध्यक्ष ॲड .सागर बनसोडे ,प्रदीप बनसोडे , प्रताप (आबा )इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून अभिवादन करण्यात आले .यावेळी बोलताना ॲड . सागर बनसोडे सर यांनी आंबेडकरांचा संदेश शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा आपला लढा यासाठी आहे ,माणूस म्हणून जगण्यासाठी आहे डॉक्टर आंबेडकरांचे हे तीन शब्द आजच्या पिढीलाही गरजेचे वाटतात असे त्यांनी सांगितले, प्रदीप बनसोडे, प्रताप (आबा) इंगवले यांनी ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले विचार, व व शहीद अशोक कामटे संघटना राबवत असलेल्या विविध ऊपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सायकलिंग क्लब सांगोलाचे ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब लाडे, ॲड.हर्षवर्धन चव्हाण, निलेश नष्टे,आशिष जाधव, विठ्ठलपंत शिंदे सर, संदीप बनकर, नितीन कुंभार, शहाजी पाटील यांनीही महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर व आभार चारूदत्त खडतरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments