ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह भोसले यांचा युनियन बँकेच्या वतीने सत्कार

बार्शी (क.वृ.): युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सुमारे सात कोटी रुपये बक्षिस असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व बार्शी शहरातील रहिवाशी असलेले रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाल्याबद्दल युनियन बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक सुजित तरीवाल, प्रबंधक सचिन शिंदे प्रबंधक भरत कुमार, सहाय्यक प्रबंधक प्रवीण खटकाळे, सहाय्यक प्रबंधक कृष्णा चौधरी आदींनी त्यांच्या बार्शी येथील घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी डिसले यांचा युनियन बँकेच्या वतीने शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक सुजित तरिवाल यांनी डिसले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments