सांगोला येथील दुय्यम निबंधक कोकाटे यांना बडतर्फ करावे - सामाजिक कार्यकर्ते कालिदास कसबे यांची मागणी

सोलापूर (कटूसत्य. वृत्त.):- सांगोला शहरातील शेती झोन क्षेत्राची 21 गुंठे खालील म्हणजे एक गुंठा पासून ते 19 गुंठे पर्यंत खरेदी-विक्री करीत असलेने तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग करीत असल्याचे तसेच सांगोला शहरातील कुळाच्या जमिनी कुळाच्या परस्पर त्यांच्या विनापरवाना संमतीविना बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री करीत असल्याने जनतेची फसवणूक होत आहे. संबंधित जमीन धारकाला कोणत्याही प्रकारचा लाभ अथवा कर्ज घेता येत नसल्याने जनतेतून सांगोला दुय्यम निबंधक कोकाटे यांचे विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना तात्काळ बडतर्फ करावे,अशी मागणी मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडे सामाजिक कार्यकर्ते कालिदास कसबे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की संबंधित क्षेत्राची मोजणी करून त्याचे भूखंड पडल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहार होणे आवश्यक असताना दुय्यम निबंधक महोदय आर्थिक लाभासाठी शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करीत असून आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तसेच बोगस व्यक्ती उभे करून सुद्धा या कार्यालयाकडून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याचे खात्रीलायक समजते. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित अधिकारी कोकाटे यांना माफ न करण्यासारखे असून त्यांना त्वरित बडतर्फ करावे अशी मागणी मुद्रांक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते कालिदास कसबे यांनी केली आहे.
यावेळी आमचे प्रतिनिधींनी कोकाटे यांना विचारून माहिती घेतली आता--नगरपालिकेस तुकडा बंदी,तुकडे जोड बंद कायदा लागू नाही. त्यामुळे ही सर्व दस्ताऐवज होतात.अनधिकृत काम कोणतेही होत नाही. - कोकाटे (दुय्यम निबंधक सांगोला)
0 Comments