आमदारकीसाठी मानेंनी दिला खोटा दाखला-क्षीरसागरांनी केला आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी 1985 चा विमुक्त जातीचा दाखला लपून अनुसूचित जातीचा दुसरा दाखला बुलढाणा जिल्ह्या मध्ये जात पडताळणी समितीकडून मिळवला असून त्यांनी जनतेची, शासनाची तसेच न्यायालयाची फसवणूक केली असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे युवा नेते सोमेश शिरसागर यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या बंधुचा हनुमंत माने व आमदार माने यांचा स्वतःचा दाखला विमुक्त जातीचा असल्याचे पुरावे उपलब्ध झाले असून हनुमंत माने यांच्या मुलीला ह्याच दाखल्याच्या आधारे कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षक म्हणून नोकरी सुद्धा मिळवलेली आहे. या माने कुटुंबियांना दोन्ही प्रमाणपत्र दिल्याने न्यायालय देखील संभ्रमात असून आमदार माने आणि कुटुंबीय यांनी विदर्भातून रहिवासी दाखवून अनुसूचित जातीचा दाखला काढून लाभ मिळवत आहे. तर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संचालक तसेच मोहोळ येथे आमदारकी साठी निवडून देखील आले आहेत आणि सोयीनुसार मुलीला जातीच्या संवर्गातून नोकरी लावले आहे. हे नेमकं चाललंय तरी काय असा आरोप करीत पुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी आमदार माने कुटुंबियांना बोगस मिळालेले दोन्ही संवर्गातील जातीचा लाभ घेऊन त्यांनी शासनाची व न्यायालयाची फसवणूक केली म्हणुन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशीही मागणी सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी केली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत माने यांनी सन 2006 मध्ये पुणे जात पडताळणी समितीकडून विमुक्त जातीत संवर्गाचे वर्गाचा दाखला वैद्य करून घेतला त्याचे पुराव्यानिशी कागदपत्रे क्षीरसागर यांच्या कडे आहेत. तर विमुक्त जातीचा दाखला वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानासुद्धा हनुमंत माने यांनी अनुसूचित जातीचा लाभ घेण्याकरिता वस्तुस्थिती लपून मुक्काम पोस्ट चिखली तालुका बुलढाणा येथील खोटा रहिवासी दाखला दाखवून अनुसूचित जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र काढून घेतले सन 2008 मधली यासंदर्भात आमदार यशवंत माने यांनी सुद्धा अनुसूचित जातीचा दाखला घेऊन निवडणूक लढवून विजय मिळवला असला तरी ही निवडणूक आयोगाची आणि न्यायालयाची सुद्धा फसवणूक केल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट झाले आहे. सोमेश क्षीरसागर यांनी बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दाखल केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चार वर्ष नागनाथ शिरसागर या पराभूत उमेदवारांची चौकशी केली मात्र विद्यमान यशवंत यशवंत माने यांच्या चौकशी साठी चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप ही क्षीरसागर यांनी केला. तसेच बुलढाणा आणि सोलापूर या दोन्ही जात पडताळणी कार्यालयात भेद कसा असतो असा प्रश्न सुद्धा क्षीरसागर यांनी विचारला आहे. शेवटी राजकीय दबावापोटी अधिकारी काम करत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. शेवटी बोलताना सोमेश शिरसागर म्हणाले, आ. यशवंत माने यांच्या विरुद्धची लढाई तत्त्वाची लढाई आहे. यामध्ये कसलेही राजकारण नाही सध्या नागनाथ क्षीरसागर यांनी मी शिवसैनिक या नात्याने महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. पक्षावरील आणि स्थानिक नेतृत्वाविषयी आम्हाला नितांत आदर आहे. महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. ही राजकीय नसून तत्त्वाची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.
ही बाब न्यायालयीन आहे. याविषयी जास्त काही बोलणार नाही. मी सध्या मतदार संघातील विकास कामांबाबत मुंबई मध्ये आहे. अशी कामे उद्योग नसणार्यांची असतात माझ्या सारख्या प्रयत्नवादी व्यक्तींची नाहीत. सोमेश हे खुप हुशार व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आपल्या मतदार संघासाठी आपला वेळ व मेहनत खर्ची करावी.
- आ. यशवंत माने
माने यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघातील मतदार, शासन, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व न्यायालयाची फसवणूक केली म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून मी न मागता आमदारकीचा राजीनामा द्यावा. -सोमेश क्षीरसागर.
0 Comments