Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ मतदारसंघातील महामार्गावरील समस्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार - आमदार यशवंत माने यांची ग्वाही

मोहोळ मतदारसंघातील महामार्गावरील समस्यांबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार - आमदार यशवंत माने यांची ग्वाही

भुयारी मार्गाचा प्रश्न येत्या काही महिन्यात सोडविणार

मोहोळ (साहील शेख)(कटुसत्य. वृत्त.): सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लांबीचे दोन राष्ट्रीय महामार्ग हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधून जातात. महामार्गाच्या बांधणी बरोबर त्यांच्या दर्जा आणि गुणवत्ते बरोबर वेळोवेळी यांची देखभाल देखील होणे गरजेचे आहे. महामार्गांचा दर्जा आणि  देखभाली अभावी महामार्गावर अपघात वाढले आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने येत्या काही दिवसात  मार्गदर्शक नेते शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितिन गडकरी आणि संबंधित विभागाचे सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मोहोळ मतदारसंघातील महामार्गाच्या संबंधातील अडीअडचणी मतदार संघाचे विकास मार्गदर्शक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी  दिली.

याशिवाय मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम खाते विभागाअंतर्गत येणाऱ्या मार्गांच्या देखभाली संदर्भातही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण या विभागाचे सचिव यांच्या समवेत एक महत्वाची बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी यावेळी दिली. पुढील दोन वर्षात निश्‍चितपणे मतदारसंघातील जवळपास सर्वच रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

मात्र गेल्या काही महिन्यापासून मोहोळ मतदार संघातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर महामार्गाची देखभाल देखील वेळेत होणे आवश्यक आहे. जरी हा महामार्ग संबंधित टोल कंपनीकडे टोल आकारणी आणि देखभाल तत्त्वावर असला तरी वेळोवेळी देखभाल होणे गरजेचे आहे . त्याचबरोबर अनगर -यावली फाटा, मोहोळ मधील कन्या प्रशाला चौक या ठिकाणी भुयारी मार्गाची गरज आहे. या ठिकाणचे अपघात थांबवणे गरजेचे असल्याने सदर भुयारी मार्गाचे  काम त्वरित सुरू होण्यासाठीही केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हा महामार्ग अपघातमुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार माने यावेळी म्हणाले.

मतदारसंघातील रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखले जातात. मतदारसंघाच्या दक्षिण भागातून विजापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून हा मार्ग मजबुतीकरण त्वरित सुरू करून याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.सोलापूर पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या तसेच गतिरोधक  दुभाजक दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भुयारी मार्ग नसल्याने रस्ता ओलांडताना शाळकरी विद्यार्थी त्याचबरोबर अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी दिवाबत्ती ही सुरू करण्याबाबत व इतरही महत्त्वाच्या समस्या बाबत केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधणार आहे. - आमदार यशवंत माने (मोहोळ विधानसभा मतदारसंघ)

Reactions

Post a Comment

0 Comments