Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडीसह परिसरात भारत बंदला उस्फुर्त प्रतिसाद

कुर्डुवाडीसह परिसरात भारत बंदला उस्फुर्त प्रतिसाद

कुर्डूवाडी(कालीदास जानराव)(कटूसत्य. वृत्त.): भारत बंद या शेतकरी आंदोलनास कुर्डुवाडी शहरासह विस्तारित भागातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सकाळपासून शहरातील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील रेल्वे कॉलनी,बार्शी नाका, टेंभुर्णी रोड, पंढरपूर रोड,माढा रोड,पोस्ट चौक, गांधी चौक, टिळक चौकासह हद्दवाढ भागातील माऊली नगर, सम्राट अशोक नगर, गणेश नगर,परांडा रोड याठिकाणी कमालीचा शुकशुकाट दिसून आला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदला पाठिंबा दिल्याने बाजार समितीच्या आवारात शांतता पसरली होती. अत्यावश्यक सेवेमध्ये दवाखाने, मेडिकल,बँका आणि दुग्धव्यवसाय इत्यादी चालू होते. शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेड व पंजाब तालीम मित्र मंडळासह अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सुहास टोणपे,तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,अरुण जगताप, शिवराज पवार,विक्रम ठेंगल, पोपट माने,दादा वाघमोडे,शिवम ठेंगल आदिनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घोषणाबाजी करीत महाराजांना अभिवादन करून या आंदोलनाला पाठिंब्याची भूमिका बजावली.

Reactions

Post a Comment

0 Comments