पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील नियुक्ती परिक्षेमध्ये विहीत केलेल्या किमान गुणांची अट 45 % ऐवजी 40 % करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार - दत्तात्रय भरणे
आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मा. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन यांच्यासोबत बैठक
सोलापूर (कटूसत्य वृत्त): आज दि. 29 डिसेंबर 2020 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी पदवीधर अंशकालीन शासकीय सेवेतील नियुक्ती परिक्षेमध्ये विहीत केलेल्या किमान गुणांची अट रद्द करून परिक्षेमध्ये सुट मिळण्याकरीता मा. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन यांच्याकडे संबंधीत शिष्टमंडळासमवेत बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीमध्ये शासन निर्णय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र.प्रानिम/2007/प्र.क्र.46/2007/13अ,दि.26/6/2008 नुसार नामनिर्देशकाच्या कोट्रयातील गट क मधील पदे भरताना अनुसरवायचे कार्यपध्दती परिच्छेद क्र. 5 नियुक्तीच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी किमान गुणाच्या 40 टक्के गुणाची अट ठेवण्यात आहे. शासन निर्णय क्र. अशका/1998/प्र.क्र.507/16अ, दि. 2 मार्च 2019 नुसार पदवीधर/पदवीधारक/ अंशकालीन उमेदवारांना नियुक्तीसाठी 10 टक्के समांतर आरक्षण लागू केले आहे. सदर नियुक्तीची वयोमर्यादा वयाच्या 46 वर्षे करून सवलत दिली आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, इंग्रजी परिपत्रक क्र.इएक्सडी 1080/34 XVII दि.185/1980 नुसार सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास विभागीय परिक्षा वयाची 45 वर्षानंतर सुट देण्यात यावी अशाचप्रमाणे सेवा विषयक नियमात विभागीय परिक्षेतून सुट देण्याबाबत तुरतुद आहे. सदर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना आजतागायत शासन परिपत्रक 2 जानेवारी 2019 नुसार 55 वर्षापर्यंत सवलती देण्यात आलेली आहे. 10 टक्के आरक्षण दिल्याने त्यातून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना भरतीकरणे बंधनकारक असताना केवळ 45 टक्के गुणाची अट लागल्याने पात्र उमेदवार न मिळाल्याने इतर आरक्षणातून पदे भरले जातात. यावरून पदवीधर अंशकालीन कर्मचारी कोणत्याही शासकीय सेवेचे परिक्षा देण्यास तयार असून सदर परिक्षा देताना निवड प्रक्रियेमध्ये किमान 90 मार्क मिळणे आवश्यक आहे. सदर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आलेल्या सवलतीनुसार त्यांना किमान 90 गुणाची अट रद्द करण्यात यावी. शासन निर्णयानुसार 10 टक्के आरक्षण दिलेले असताना 10 टक्के आरक्षणात पदवीधर अंशकालीन कर्मचारी भरती होवू शकत नाहीत, यामुळे सदर आरक्षणामध्ये इतर उमेदवार भरले जातात. याकरीता पदवीधर अंशकालीन शासकीय सेवेतील नियुक्ती परिक्षेमध्ये विहीत केलेल्या किमान गुणांची अट रद्द करून परिक्षेमध्ये सुट मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री. दत्तात्रय भरणे, मा. राज्यमंत्री, सामान्य प्रशासन यांना सांगितले.
याबाबत श्री. दत्तात्रय भरणे, मा. राज्यमंत्री, सामान्य प्रशासन यांनी सकारात्मक प्रतिसादे देवून सांगितले कि, पदवीधर अंशकालीन शासकीय सेवेतील नियुक्ती परिक्षेमध्ये विहीत केलेल्या किमान गुणांची अट 45 % ऐवजी 40 % करण्याकरीता प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार असे आश्यासन आमदार प्रणिती शिंदे व संबंधित शिष्टमंडळास दिले.
यावेळी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्षा वैशाली राणे, प्रदेश सचिव विठ्ठल व्हनमारे, जिल्हाध्यक्ष गफुर शेख, जिल्हा सचिव प्रकाश होटकर, अंकीता कोलपे व अव्वर सचिव, सचिव, कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासनाचे इतर संबंधित अधिकारी व संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments