कोरोना लॉकडाऊन :... म्हणून राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील - राजेश टोपे
बिनधास्त फिरण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने पुन्हा निर्बंध लागू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. "आपल्याला घराबाहेर पडताना मास्क परिधान करावाच लागेल. घराबाहेर असताना सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. दिल्लीत मास्क परिधान न करणाऱ्यांना २००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. राज्यातल्या लोकांनी सहकार्य केलं तर असा जबर दंड आकारावा लागणार नाही. लॉकडाऊन लागू केला नसला तरी निर्बंध लागू करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांचीही तशी भूमिका आहे," असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल असं टोपे यांनी सांगितलं. लग्न समारंभांकरता दोनशे लोकांच्या उपस्थितीली असलेली परवानगी कमी करण्यात येणार असल्याचे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. गर्दी करणं टाळायला हवं. गर्दीच्या वेळा टाळायला हव्या. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर निर्बंध सिथील केले होते, पण पुन्हा आकडे वाढत असतील तर निर्बंध पुन्हा कठोर करावे लागतील, असं त्यांनी सांगितलंय.
0 Comments