विधानपरिषद निवडणूक- क्षेत्रीय अधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश

सोलापूर, (क.वृ.): पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रदान केले आहेत.
या पदाचा कालावधी शासन मान्यतेनुसार २९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या सायंकाळी ६ वाजलेपासून ते १ डिसेंबर २०२० पर्यंत राहणार आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना फोजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२९, १३३, १४३ आणि१४४ नुसार अधिकार प्राप्त राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments