महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष; शिक्षक मतदार संघ निवडणूकीतील चुरस वाढली
पंढरपूर (क.वृ.) :- पुणे शिक्षक मतदार संघात नेहमीच निर्णायक भूमिकेत असलेल्या राज्य मुख्यध्यापक महामंडळाने अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर महामंडळाची येत्या 19 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात बैठक बोलवण्यात आली आहे.
या बैठकीला पुणे विभागातील सुमारे 500 हून अधिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने यांनी दिली. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत समर्थकांचे डोळे मुख्याध्यापक महामंडळाच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. मुख्याध्यापक आणि 2014 साली महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुभाष माने यांनी पुरोगामी शिक्षक लोकशाही आघाडीतून निवडणूक लढवली होती.या निवडणूकीमध्ये प्रा. माने यांना प्रथम पसंतीची 3 हजार तर दुसर्या पसंतीची तब्बल 12 हजार मते मिळाली होती. या निवडणूकीत आ. सावंत यांना पहिल्या पसंतीची 6200 तर भगवान साळुखे यांना 5900 मते मिळाली होती. तिरंगी लढती मध्ये आमदार सावंत यांनी बाजी मारली होती. गेल्या निवडणूकीत आमदार सावंत यांना सोलापूर सह अन्य जिल्ह्यातील काही मातब्बर राजकीय नेत्यांचा आशिर्वाद मिळाला होता. सर्वसमावेश उमेदवार म्हणून त्यांनी बाजी मारली होती. मात्र यावेळी शिक्षक जागा काँग्रेसला सुटल्याने आमदार सावंतांची अडचण झालीय. त्यामध्येच आता मुख्याध्यापक संघ काय भुमिका घेतो हे देखिल महत्वाचे असणार आहे. गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांनातर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीने जयंत आसगावकर यांना तर भाजपने जितेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने निवडणूकीतील रंगत वाटली आहे.
विद्यमान आ. दत्तात्रय सावंत यांना आघाडीची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती,परंतु काँग्रेसने आपला स्वतंत्र
उमेदवार दिल्याने आमदार सावंतांनी चांगलीच अडचण झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने शिक्षक मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने आमदार सावंतांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मुख्याध्यापक महा मंडळाने भूमिका जाहीर करण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यध्याप महामंळाचे पदाधिकारी कोणती भूमिका घेतात यावर ही तिन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
बैठकीत चर्चा करूनच आमचा पाठिंबा जाहीर करू असेही प्रा. सुभाष माने यांनी सांगितले.
0 Comments