पंचवीसावे मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूरात निश्चित संमेलनाध्यक्ष पदाचा बहुमान डॉ. रावसाहेब पाटील यांना
सोलापूर (क.वृ.) : - महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलनाचे हे रौप्यमहोत्सवी सम्मेलन असून या ऐतिहासिक सम्मेलनाच्या अध्यक्षपदाच्या बहुमानासाठी सोलापूर येथील पंचरंग प्रबोधिनीचे संपाददक, ज्येष्ठ साहित्यिक व वक्ते प्रा.डॉ. रावसाहेब पाटील यांची एकमताने निवड झाल्याची माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत निवड समितीचे समन्वयक व साहित्य परिषदेचे चेअरमन प्रा.डी.ए. पाटील यांनी दिली. फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या या त्रिदिवशीय सम्मेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी प.पू. भट्टारक चारूकीर्तिचे मंगल सान्निध्य लाभणमार असून गौरव उपस्थिती म्हणून करवीर संस्थानचे छत्रपती युवराज संभाजीराजे, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय ज्ञानपीठाचे निर्देशक साहू अखिलेश जैन (दिल्ली), उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कन्नड कादंबरीकार व जैन साहित्याचे अभ्यासक डॉ. हंपा नागराजय्या, तथा मार्गदर्शक वक्ते म्हणून तुषार गांधी, प्राचीन मराठी जैन साहित्याचे भाष्यकार डॉ. सदानंद मोरे, भारतीय पुरातत्वाचे अभ्यासक डॉ. वसंत शिंदे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. सुनिलकुमार लवटे आदि मान्यवर साहित्यिकांना निमंत्रित करण्याचे निश्चित झाले आहे. या रौप्यमहोत्सवी साहित्य सम्मेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून जैन पत्रकारितेच्या माध्यमातून मराठी जैन साहित्याला दिलेले भरीव योगदान, मराठी जैन साहित्य परंपरा व प्रवाह, पंचगंगेचे रंग, परम-दिगंबर, गोमटेश्वर, वनौषधी वैभव भाग -५, जैन आयुर्वेद, श्रवणबेळगोळ दर्शन इत्यादिचे साहित्य सृजन,, वक्तृत्व व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रबोधन अशा विविध व महत्वपूर्ण सेवेची दखल घेत त्यांच्या एकसष्ठीच्या वर्षी हा बहुमान देण्याची संधी परिषदेला लाभत असल्याचे निवड समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी सांगितले. निवड समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी, सदस्य प्राचार्य कुंतिनाथ करके, प्राचार्य गजकुमार शहा, कविरत्न विजयकुमार बेळंकी, लेखक डॉ. महावीर अक्कोळे, सौ. नीलम माणगावे आदिंनी एकमताने ही निवड केली असल्याचे डी.ए. पाटील यांनी घोषित केले.
तीन दिवस चालणाऱ्या या सम्मेलनात ध्वजवंदन, ग्रंथदिंडी, उद्घाटन समारोह, चर्चासत्रे, परिसंवाद,
व्याख्याने, कवी सम्मेलन, ग्रंथ प्रदर्शन, जैन पत्र-पत्रिका प्रदर्शन, जैन कला, स्थापत्य प्रदर्शन, २५(पंचवीस) ग्रंथाचे प्रकाशन, विशेषांक प्रकाशन, माजी सम्मेलनाध्यक्षांचा सन्मान, उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, असे एकूण २५(पंचवीस) उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याचे परिषदेचे सदस्य प्राचार्य नरेश बदनोरे यांनी सांगितले. सम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र स्तरावर एक व्यापक स्वागत समितीची निर्मिती करण्यात येत असून ज्यांना या समितीत कार्य करण्याची इच्छा आहे त्यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा असेही आवाहनाडी.ए. पाटील यांनी केले आहे.
0 Comments