रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ लवकरात लवकर स्थापन करावे
सोलापूर (क.वृ.) : - येत्या हिवाळी अधिवेशनातच रिक्षा चालकाच कल्याणकारी महमंडळ स्थापन होवून जाहीर करावे यासाठी सोलापूर येथील चार पुतळयापासून पुतळयास अभिवादन करुन अर्ज दाखल करण्यासाठी मुंबई मंत्रालय, शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री साहेब यांना स्वतः जावून अर्ज जमा करुन रिक्षा चालकाचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन जाहीर करावे. कारण आत्तापर्यंत बरेच महामंडळ जाहीर झालेले आहेत. पण महाराष्ट्र राज्यातील ११ लाख २० हजार
रिक्षा चालक या आर्थीक लाभापासून वंचितच राहिला आहे. तरी आता वंचित राहिलेला रिक्षा चालकपण आर्थीक लाभाचा भागीदार होईल याची आशा करुन आहोत. मागील काही काळपासून म्हणजे दि. २७/०३/२००५ पासून ते २००९ पर्यंत काँग्रेस सरकार पुढे म्हणणे मांडले होते. त्यावेळी मा.पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. काही काळानंतर दुसरे सरकार आले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, यांनी रिक्षा चालकाचे आर्थीक महामंडळ स्थापन झाले असे जाहीर केले व काही अंशी रक्कम दिली, ती कोणाला दिली हे सर्व खोटे ठरलेले म्हणजेच ११ लाख २० हजार महाराष्ट्रातील रिक्षा चालकाची फसवणुक झाली आहे व तोंडाला पाने पुसली म्हणून आमची निराशा झाली. त्यानंतर आले आहे ते सरकार आमचेच आहे याची नोंद घ्यावी.तरी मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व तिन पक्षाच आपल्या सरकारला उपमा, तिन चाकाच्या रिक्षाची दिसून ठाकरे साहेबांना विसर कसा काय पडलाय., याच आम्हाला कोडच समजत नाही. तरी "तिसऱ्या सरकारने हा निर्णय घ्यावा" देवा धर्मा पासून तिन पुसा असतात हे अगदी खरे आहे. तरी ११ लाख २० हजार महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकाचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन जाहीर करा व नविन वर्षाची भेट दयावी. याचा आर्थीक फायदा व जिवनमान उंचविण्यास मदत होऊन आपल्या सरकारचे नांव पण अमर राहिल असे आम्हांस वाटते हे अगदी सत्य आहे.
0 Comments