होटगी रोड विमानसेवा सुरू होण्या साठी सोलापूर
डेव्हलपमेंट फोरम आहे प्रयत्नशील
सोलापूर (क.वृ.) : - सोलापूरच्या विकासाशी निगडित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोलापूरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या शिष्टमंडळा मार्फत सोलापूर डेव्हलपमेंट फोरम ची स्थापना करण्यात आली. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सोलापूरची विमानसेवा, गिरिकणिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिकेडुन अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी
बाबतची माहिती मागवली, आणि श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को जनरेशनच्या सन २०१४ साली बांधण्यात आलेल्या अनधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयीचे महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे छायांकित प्रत प्राप्त झाले. या कागदपत्रांच्या आधारे फोरमने ती अनधिकृत बेकायदेशीर चिमणी त्वरीत पाडावी अशी मागणी प्रशासनाकडे लाऊन धरली.
सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कागदपत्रे, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांच्या चिमणी पाडकामा संबंधीच्या निकालांच्या दस्तऐवजांची प्रत सोलापूर महानगरपालिकेचे संबंधीत उच्च पदस्थ अधिकारी, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनासोबत दिले. सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या कायदा सुव्यवस्थे विषयीचे पत्र मिळता क्षणी अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी पुढिल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांनी दर्शविली. सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता सात दिवसाच्या आत अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी सकारात्मक आदेश देणार असे आश्वासन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासची आठवण करून देण्याकरिता सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी नवव्या दिवशी जिल्हाधिकारी यांची पुन्हा एकदा भेट घेतली असता, फोरमच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्याशी बोलुन आपणास उद्याच कळवतो, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यानच्या कालावधीमध्ये सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचे सदस्य श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा उद्योजक संजय थोबडे यांनी ह्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे तक्रारीच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले.होटगी रोड विमानतळ सर्वसोयींनी उत्कृष्ट विकसित असून, केंद्र सरकारच्या सर्व निकषांवर होटगी विमानतळ हे अत्यंत उत्तम स्थितीत असल्याचा निर्वाळा सर्व संबंधित संस्थांनी दिला आहे. केंद्रीय उडयन मंत्रालय मार्फत राबविलेल्या 'उडान योजने अंतर्गत सोलापूरला प्राधान्य देण्यात आले आहे, सोलापूर पेक्षा तुलनेने लहान शहरांमध्ये सदर योजना बिनदिक्कतपणे सुरू आहे. सोलापूर डेव्हलपमेंट फोरमचा श्री.सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास, त्यांच्या गाळप हंगामास कोणत्याही विरोध नसुन विमानसेवेस अडथळा असलेल्या को जनरेशनच्या अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीचे पाडकाम न्यायालयाच्या आदेशानुसार व्हावे ही आमची प्रमुख मागणी आहे असे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतनभाई शहा यांनी स्पष्ट केले. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सोलापूरात गुंतवणूक आणि व्यावसाय करण्यास उत्सुक आहेत पण विमानसेवा नसल्याने सोलापूराचा विकास खुंटला असून सोलापूर जिल्ह्यातून हजारो युवक रोजगाराच्या शोधात आपले गाव सोडून जात असल्याची भावना सर्व सोलापूरकर समाज माध्यमातून व्यक्त करत आहेत. सोलापूरकरांच्या विकासाशी निगडित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सोलापूर डेव्हलपमेंट फोरमची स्थापना झाली आहे, ज्यात उद्योजक उद्योजक केतनभाई शहा वेकअप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष अभियंता मिलिंद भोसले, गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव,उद्योजक संजय थोबडे,समाज सेवक योगीन गुर्जर,सी,ए, श्रीनिवास वैद्य,वकील प्रमोद शहा यांचा समावेश आहे.
0 Comments