Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.निलकंठ खंदारे यांची पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात आघाडी ; पदवीधर मतदारांतून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.निलकंठ खंदारे यांची पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात आघाडी  ;         पदवीधर मतदारांतून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद  

सांगोला (प्रतिनिधी) -  सांगोला येथील प्रा.डॉ.निलकंठ खंदारे यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीनी विरोधकांची दमछाक होताना दिसत असून डॉ.खंदारे यांना मात्र पदवीधर मतदारांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शुक्रवारी दिवसभर माळशिरस,पंढरपूर,मंगळवेढा,सांगोला या तालुक्याचा झंझावाती दौरा करून मतदारापर्यंत पोहचून आपला प्रचार केला.

       या पूर्वीच्या पदवीधर आमदारांनी पदवीधरांच्या प्रश्नांसाठी जेवढा संघर्ष करायला हवा होता, तेवढा या पूर्वीच्या नेते मंडळींनी केला नाही, त्यांनी  पदवीधरांना वाऱ्यावर सोडले आहे,त्यांच्या प्रश्नांसाठी तीव्र लढा उभा केला नाही,त्यामुळे पदवीधरांच्या हाती निराशा आली आणि त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, येणाऱ्या काळात आपण पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे. त्यासाठीच आपण पुणे विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढविणार आहे.पदवीधर मतदारांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन पुणे विधानपरिषद पदवीधर चे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांनी केले आहे.

          पुणे विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात डॉ.निलकंठ खंदारे यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून सर्वच जिल्ह्यातील मतदारापर्यंत ते पोहचले आहेत.निवडणुकीच्या माध्यमातून आपण बेरोजगारी कमी करण्यासाठी ,विनाअनुदानित,अंशत विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न,शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यासाठी ,शिक्षक आणि प्राध्यापकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न,पदवीधरांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे वेतन आदि मुद्दे प्रचारात घेवून आपण निवडणूक लढविणार आहे,तरी येणाऱ्या एक डिसेंबरला पसंती क्रमांक एक चे मत द्यावे असे  आवाहन ही या वेळी डॉ खंदारे यांनी केले आहे.  या वेळी त्यांच्या सोबत  ऍड शिवनाथ भस्मे,प्रा.शैलेश मंगळवेढेकर,प्रा.कैलास घोंगडे,प्रा.नागेश भोसले,प्रा.अशपाक काझी,प्रा.माने सर,प्रा.डॉअरुण शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments