Hot Posts

6/recent/ticker-posts

तांबोळे भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार यशवंत माने यांच्याकडे विजयराज कोकाटे यांची मागणी

 तांबोळे भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार यशवंत माने यांच्याकडे विजयराज कोकाटे यांची मागणी



मोहोळ (क. वृ):- मोहोळ तालुक्यातील तांबोळे ते शेजबाभुळगांव (१.५ कि.मी),तांबोळे ते सय्यद वरवडे (२ कि.मी) आणि तांबोळे ते आढेगांव (२ कि.मी) या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून प्रवास करताना तसेच शेतकऱ्यांना शेतमाल बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असून तरी सदर रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावेत,अशा आशयाचे निवेदन तांबोळे येथील रामदास कोकाटे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा युवक नेते विजयराज कोकाटे यांच्या शिष्टमंडळाने आमदार यशवंत माने, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांना दिले.

मोहोळ तालुक्यातील तांबोळे भागातील रस्ते हे खराब झाले असून यामुळे प्रवास करताना तसेच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे पर्यायाने सदरचे हे रस्ते तात्काळ डांबरी करून करून द्यावेत या मागणीसाठी तांबोळी येथील युवक नेते विजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मोहोळचे आमदार यशवंत माने व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली.यामध्ये तांबोळे ते शेजबाभुळगांव (१.५ कि.मी),तांबोळे ते सय्यद वरवडे (२ कि.मी),तांबोळे ते आढेगांव (२ कि.मी) या रस्त्यांचा समावेश आहे.या सर्व रस्त्यांचे काम लवकरात लवकर चालू करु असेही यावेळी आमदार यशवंत माने त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी स्व. रामदास कोकाटे शिक्षण संस्थेचे चेअरमन विजयराज कोकाटे,तांबोळेचे माजी उपसरपंच शिवाजी कोकाटे,तसेच अभिमान काळे,धनाजी हांडे,सचिन नागणे,नितीन नागणे,हर्षद यादव,पिंटु शिंदे,नंदकुमार सुरवसे,बापु गायकवाड,सुनील कोकाटे,शुभम लाळगे वैभव कोकाटे उपस्थित होते.

तांबोळे भागात ऊस उत्पादक शेतकरी,तरकारी, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून शेतमाल वाहून नेण्यासाठी रस्ते खराब झालेले आहेत.पर्यायाने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.या भागातील जनतेला माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शूगर चे चेअरमन बाळराजे पाटील  यांनी झुकते माप दिले आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी करताच आमदार यशवंत माने यांनीही तात्काळ रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
-विजयराज कोकाटे
तांबोळे

Reactions

Post a Comment

0 Comments