शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा नुकताच सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. शिवतेजसिंह मोहिते-पाटील हे प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असताना वयाच्या पंधराव्या वर्षी सहकार महर्षी यांच्या विचारांची शिदोरी घेऊन शिवकिर्ती युवा मंचमार्फत समाजकार्याला सुरुवात करून लोककल्याणाचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास घेतला, आणि अकलूजच्या पवित्र भूमीतून कर्तुत्वान कार्याला सुरुवात केली. अत्यंत वेगवान कार्यात त्यांनी प्रचंड मोठा ठसा उमटवत गेले. अकलूज गावाबद्दलच्या आत्मीयतेमुळे त्यांना सरपंच पदाचा बहुमान मिळाला आणि आशिया खंडातील सर्वात अग्रेसर अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ते विराजमान झाले. शिवतेजसिंह मोहिते-पाटील सारखे निष्पाप, निर्मळ व्यक्तीमत्वाकडून विकासाच्या अपेक्षा वाढत गेल्या! समानता आणि समदृष्टीपणा ठेवत शिवतेजसिंहांनी गावच्या कारभाराला सुरुवात केली. नम्रता सौजन्य आणि प्रसन्न भावमुद्रा ठेवत त्यांनी अकलूजच्या विकास कामाला चालना देत गेले. त्यांच्या या गुणांमुळे शिवतेजसिंह मोहिते-पाटील हे लोकप्रिय सरपंच ठरले.
शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात जीपीएस प्रणालीद्वारे घरपट्टी, झोपडपट्टी पुनर्वसन, जुने नवीन कागदपत्रे स्कॅनिंग, जीआय पाइपलाइनद्वारे नळकनेक्शन, अकलूजच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख चौकांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे सुशोभीकरण, २००२ कुटुंबांना शिधापत्रिका वाटप शिबीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग अनुदान, घंटा गाड्यांना जीपीएस प्रणाली, अपंगासाठी योजना, जिल्हा परिषद शाळासाठी विविध सुविधा, वृक्षारोपण, खोलीकरण रुंदीकरण, कोरोनासाठी उपाययोजना, क्रीडा संकुल येथे सर्वात मोठा झेंडा, या पाच वर्षात विविध फंड व निधीतून २८.६ किलोमीटर रस्ते, ४.४ किलोमीटर गटर, दिवाबत्ती, कर्मचाऱ्यांचा दोन लाखाचा विमा, अशा विविध विकासकामांचा चढता आलेख सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी रचला असून ३९ कोटी ६७ लाख २४ हजार ४५७ रुपयांच्या विकासकामांना चालना देऊन विकासमय प्रवासाचे मानकरी ठरले आहेत.

0 Comments