टेंभुर्णी येथील देवस्थान जमिनीची खरेदी-विक्री थांबवण्यासाठी धोत्रे यांचे उपोषण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

टेंभुर्णी येथील देवस्थान जमिनीची खरेदी-विक्री थांबवण्यासाठी धोत्रे यांचे उपोषण

टेंभुर्णी येथील देवस्थान जमिनीची खरेदी-विक्री थांबवण्यासाठी धोत्रे यांचे उपोषण


अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचा माढा तहसील समोर उपोषण

टेंभुर्णी (क.वृ.): वडार समाजाचा आद्य पुरुष हनुमान तथा मारुती देवस्थानच्या टेंभुर्णी येथील जमिनीची अवैधरित्या होणारी खरेदी विक्री थांबवावी या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेच्या वतीने माढा तहसील समोर उपोषणाचे निवेदन देऊन उपोषण करण्यात आले.

असून वडार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या मारुती देवस्थान च्या नावे तेंभूर्णी मध्ये असणारी जमीन ट्रस्ट च्या काही पदाधिकाऱ्यांनी परस्पर बिगर शेती करून विक्रीस काढल्याने टेंभुर्णी तील गाव दैवत मारुती व्यवस्थांची दरवर्षी भरणारी यात्रा अडचणीत येऊ शकते या उद्देशाने वडार समाज संघटना मारुती देवस्थान ट्रस्ट च्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यास विरोध असल्याने वडार समाज संघटनेच्या वतीने माढा तहसील समोर उपोषण धरण्यात आले.

वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार  बाबा धोत्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी मारुती देवस्थान यात्रा गाव यात्रा  साजरी होत असून गावातील 30 ते 35000 भक्त  यात्रेला जमा होतात. या देवस्थानांच्या मालकीची असणारी जमीन या जमिनीतील उत्पन्नाच्या माध्यमातून यात्रेचा खर्च केला जातो. परंतु गावातील जनतेला विश्वासात न घेता आजच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजकीय लोकांना प्रशासनाच्या अधिकाऱ्याला अर्थपूर्ण सहाय्य करून राजकीय पुढारी यांनी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी महसूल मधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिगर शेती करून विक्री करण्यास  सुरुवात केली आहे त्यामुळे याच देवस्थानच्या यात्रेवर व गावातील हनुमान भक्तांच्या श्रद्धेवर यातून घाव घातला जात आहे . तरी

तो त्वरित थांबवुन या जमिनीची बेकायदेशीररित्या होणारी बिगर शेती व खरेदी विक्री त्वरित थांबवावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्या वतीने आम्ही माढा तहसील समोर उपोषण धरले असल्याचे सांगितले. उपोषण धरून ही प्रशासनाने याची दखल न घेतल्यास वडार समाजाचे आराध्य दैवत मारुती देवस्थान च्या जमिनीसाठी महाराष्ट्रभर या जमिनीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे  धोत्रे यांनी सांगितले. मारुती देवस्थान जमीन विकताना देवस्थानाच्या ट्रस्टला विचारात न घेता बिगर शेती करून लाखो रुपये किमतीने गुंठेवारी पाडून लोकांना विकण्यात येत आहे यातून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपये मधून महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण सहाय्य करून हे प्रकरण निकाली काढण्यात आले असल्याचे सांगितले .

याची त्वरित चौकशी करून या गावातील जनतेला प्रशासनाने न्याय देवा अन्यथा महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषण कर्त्या वेळी राजकुमार बाबा धोत्रे यांनी दिला आहे. माढा तहसीलदार समोर उपोषण मध्ये वडार समाजाचे रोहिदास पवार, राहुल पवार, संभाजी धोत्रे, तानाजी धोत्रे, रोहित धोत्रे, सचिन पवार, गणेश मदने, समाधान धोत्रे, बाबा पवार, अधिक जणांनी उपोषणात भाग घेतला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages