महादेव इंद्रजीत पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

टेंभुर्णी (क.वृ.):- टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलचे उपक्रमशील शिक्षक महादेव इंद्रजीत पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच तो समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी वानवडी पुणे येथे महात्मा फुले नाट्यगृहात संपन्न होत आहे.या संमेलनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात येतात.
या पुरस्कारासाठी यंदा महादेव पवार यांची निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी पत्र देऊन पुरस्काराची माहिती दिली आहे.पुरस्कार जाहीर झाल्यामुळे महादेव पवार यांचे न्यू इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक डी.टी.गोंजारी,शिक्षक पालक-संघाचे उपाध्यक्ष वसंत येवले-पाटील व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments