Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसेच्या आंदोलनाला महिलांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, बचत गट मायक्रो फायनान्स विरोधात दिले निवेदन

 मनसेच्या आंदोलनाला महिलांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, बचत गट मायक्रो फायनान्स विरोधात दिले निवेदन


सांगोला (क.वृ.):-  सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी 13 ऑक्टोबर रोजी सर्व बचत गट मायक्रोफायनान्स यांना सक्तीची वसुली करू नये, असा आदेश काढला असतानाही सर्व बचत गट, मायक्रो फायनान्स यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली व सक्तीची वसुली साठी तालुक्यातील सर्व महिलांना तगादा लावत आहेत.नुकत्याच सावकारी वसुलीच्या तगाद्याला कंटाळून वाढेगाव येथील एका इसमाने आत्महत्या केली आहे. या कोरोनाच्या संकटकाळात ही या मायक्रो फायनान्स, बचत गट कंपनीना कोणत्याही स्वरूपाची माणुसकीची जान दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व मायक्रो फायनान्स कंपनी विरोधात कायद्याचा बडगा उगारला पाहिजे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी यांच्यावतीने धरणे आंदोलन केले होते, या आंदोलनास सांगोला शहर आणि तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

        या आंदोलनाची दखल घेऊन निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे  यांनी संबंधित कंपनी जर सक्तीची वसुली करत असल्याचे जर आढळले तर,  त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर ही जर मायक्रो फायनान्स बचत गट वाल्यांनी महिला माता-भगिनींना त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि असा मुजोर बचत गट, मायक्रोफायनान्स वाल्यांना, त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व सुरक्षारक्षक सेनेचे चिटणीस विनोद बाबर यांनी केले. यावेळी उपस्थित माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष दिपाली बाबर, तसेच शहराध्यक्ष वैशाली भोकरे, नागूताई सूर्यगंध, पाटोळे मॅडम अक्षय विभुते, कृष्णदेव इंगोले ओमकार शिंदे,आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments