स्वच्छ सर्वेक्षण -2021 अंतर्गत सांगोला नगरपरिषदेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन
हॉटेल,शाळा,हॉस्पिटल, कार्यालय,सोसायटी यांचे होणार मूल्यांकन
सांगोला (क.वृ.):- देशास स्वच्छ सुंदर बनविणे व घनकच-याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशातून “स्वच्छ् भारत मिशन”या मोहिमेची 2 ऑक्टोबर 2014 पासून देशपातळीवर सुरुवात झाली. या मोहिमेस यशस्वीे करण्या करीता केंद्रसरकार मार्फत देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वच्छतेसंबंधी विविध निकषांवर आधारित स्वच्छ सर्वेक्षण नावाची स्पर्धा घेतली जाते. मागील वर्षीच्या "स्वच्छ सर्वेक्षण 2020" मध्ये सांगोला नगरपरिषदेचा पश्चिम विभागामध्ये देशात 36 वा क्रमांक मिळालेला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 ची सांगोला नगरपरिषदेमार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरातील नागरिक व आस्थापना मालक यांच्यामध्ये स्वच्छतेप्रती जनजागृती होण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ कार्यालय, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ् सोसायटी या पाच गटामध्ये स्पर्धा होणार आहेत. यामधील प्रत्येक गटामधील सहभाग नोंदविणा-या आस्थापनांचे स्वच्छ्तेच्या विविध निकषांवर मुल्यमापन करुन प्रत्येक गटातील सर्वात स्वच्छ तीन आस्था्पनांची निवड केली जाणार असून त्यांना नगरपरिषदेमार्फत प्रशतीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता दिनांक 17 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत आपला सहभाग नोंदविण्याकरीता शहरातील हॉटेल,शाळा,हॉस्पिटल,कार्यालय, सोसायटी प्रमुखांनी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक संजय दौडे 8007773464, शहर समन्वयक शिवाजी सांगळे 8805972324, सहाय्यक आरोग्य निरीक्षक श्री. प्रशांत बनसोडे 7385751312 यांच्या्शी संपर्क साधावा.
स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
1) नाव/सहभाग नोंदणी- 17/11/2020 रोजी 5.00 वाजेपर्यंत.
2) स्पर्धकांना तयारीसाठी वेळ – 18/11/2020 ते 22/11/2020 पर्यंत.
3) सहभागी स्पर्धकांचे प्रत्यक्ष भेटीद्वारे मुल्यमापन- 23/11/2020 ते 25/11/2020 पर्यंत 4) स्पर्धेचा निकाल- 26/11/2020 रोजी.
स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या आस्थाापनांची खालील मुद्याच्या आधारे गुणांकन करण्यात येईल .
1. आतील आणि बाहेरील परिसर स्वच्छता
2. निर्माण होणारा कचऱ्याचे नियोजन कशाप्रकारे करतात?
उदाहरणार्थ ओला-सुका वर्गीकरण, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, कंपोस्टर खत तयार करणे. 3. स्वच्छता गृहांची स्वच्छता, स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळी स्वाच्छता गृहे आहेत का?
4. नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही अथवा इतर पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत का?
5. मास्क, सॅनिटायझर,सुरक्षित अंतर यांचे माहिती देणारे संदेश लिहिले आहेत का, येणाऱ्या ग्राहकांकडून याची अंमलबजावणी होते का?
उपरोक्त प्रत्ये्क मुद्यास 20 गुण अशाप्रकारे 100 गुणांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
शहरातील व्यापारी आस्थापनामध्ये स्वच्छता राखली जाणे ही शहरातील नागरीकांच्या आरोग्या्च्या दृष्टीकोनातून आवश्यक बाब असून कोरोना महामारीच्या पार्श्वाभुमीवर याचे महत्व आणखीनच अधोरेखित झाले आहे. स्वच्छतेशी संबंधित विविध निकषाच्या आधारे घेतल्या जाणा-या या स्पर्धांमध्ये शहरातील आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सहकार्य करावे.
- कैलास केंद्रे मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद
दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगोला नगरपरिषदेचा देशात उत्कृष्ट क्रमांक येण्याकरिता व जनतेत स्वच्छतेप्रति जनजागृती होण्याकरिता या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. शहरातील जास्तीत जास्त आस्थापनांनी यात सहभाग नोंदवून आपल्या सांगोला शहरास स्वच्छ व सुंदर बनविण्यास सहकार्य करावे.
सौ.राणीताई माने
नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद
0 Comments