आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे हातीद येथे उदघाटन

सांगोला दि.८(क.वृ.):- देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सांगोला विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने तालुक्यात रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहास आज गुरुवार दि. 8 ऑक्टोबर रोजी हातीद येथून सुरुवात करण्यात आली .हातीद येथे झालेल्या या रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भारत देश हा सध्या कोरोना सारख्या भयानक आजाराशी झुंज देत असून कोरोना बाधित रुग्णांसाठी मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सदरचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 14 ऑक्टोबर रोजीच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान सप्ताहामध्ये गुरुवारी दि.8 ऑक्टोबर रोजी हातीद येथून सदरच्या रक्तदानास सुरुवात करण्यात आली असून या उदघाटन प्रसंगी हातीदचे उपसरपंच शहाजी घाडगे, युवा नेते प्रमोद घाडगे ,डॉक्टर राज पाटील, माजी सरपंच नारायण माळी, प्रदीप घाडगे, डॉक्टर सुनील पाखरे, धनाजी खंडागळे, ज्योतिराम कोळी, तानसिंग घाडगे, अमोल घाडगे, सचिन घाडगे, भगवान भडंगे, आनंदराव घाडगे, रंजीत भगत, संतोष बनसोडे, लक्ष्मण घाडगे, मधुकर घाडगे, अक्षय भडंगे, संतोष भगत, भानुदास घाडगे, दिलीप घाडगे, प्रकाश मेटकरी, शिवाजी चव्हाण यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. उद्या शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर रोजी वाटंबरे येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून शनिवार दि.10 ऑक्टोबर रोजी पळशी येथे, रविवार दि.11 ऑक्टोबर रोजी मेडशिंगी येथे, सोमवार दि.12 ऑक्टोबर रोजी एखतपूर, मंगळवार दि.13 ऑक्टोबर रोजी वाडेगाव येथे व बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी चिकमहुद असे रक्तदान शिबिराचे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. संबंधित सर्व ठिकाणच्या रक्तदानाची वेळ हि स. 9 ते सायंकाळी 4 पर्यंत ठेवण्यात आली आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. सदर शिबिरामध्ये रेवनील ब्लड बँक सांगोला च्या वतीने रक्तसंकलनाचे काम करण्यात आले.
0 Comments