मिशन मोदी अगेन पीएम संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित


सोलापूर दि.३(क.वृ.):- सोलापूरातील अनेकांना मिशन मोदी अगेन पीएम संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून खा. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे हस्ते सन्मानित केले.
समृद्ध डेव्हलपमेंट डेमोक्रॅटिक ट्रस्ट दिल्ली ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रव्यापी संस्था असून केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि समाजातील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या घटकांना प्रोत्साहित करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. कोरोना महामारीच्या काळात ज्या तरुणांनी आपल्या जीवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी समाजोपयोगी कार्य केले आहे, अशा तरुणांना खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते कोरणा योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात मिशन मोदी अगेन पीएम या संस्थेच्या सोलापूर जिल्हा लीगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड.आकाश अरुण देठे यांची नियुक्ती ती तसेच शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी सौ सुनीता उल्हास घाडगे यांची नियुक्ती पत्रे खा.स्वामी यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी भारत माता की जय हर हर मोदी-घर घर मोदी अशी शपथ देण्यात आली. प्रत्येक घरात तरुण पिढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण केले पाहिजे असे सूचक विधान खा.जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
सदर कार्यक्रमास खासदारांचे कार्यालय स्वीय सहाय्यक श्रीकांत माळगे, बुळळी, मिशन मोदी अगेन पीएम संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष शिवानंद हिप्परगे, प्रदेश महामंत्री संजय पवार, सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष ओम घाडगे, श्री सिद्धेश्वर कारखान्याचे माजी संचालक याबाजी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments