शासनाने भक्कम बाजू मांडून लवकरात लवकर आरक्षण स्थगिती उठवावी- खा. छत्रपती संभाजी राजे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

शासनाने भक्कम बाजू मांडून लवकरात लवकर आरक्षण स्थगिती उठवावी- खा. छत्रपती संभाजी राजे

 शासनाने भक्कम बाजू मांडून लवकरात लवकर आरक्षण स्थगिती उठवावी-खासदार छत्रपती संभाजी राजे


छत्रपती शिवाजी चौक येेेथील नूतन अश्वारूढ पुतळ्यास खासदार छत्रपती संभाजी राजे यांंची सदिच्छा भेट


सांगोला (जगन्नाथ साठे ):- सांगोला येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नूतन बांधकामास खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सदिच्छा भेट देऊन पुतळ्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  पूरग्रस्त पंढरपूरला भेट देण्यासाठी निघाले असता  त्यांनी सांगोला येथे धावती भेट दिली.या वेळी असंख्य शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.


       या प्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना छत्रपती संभाजी महाराज मराठा आरक्षणासंदर्भात म्हणाले की,शासनाने आपली बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडावी, आणि मराठा समाजाला न्याय द्यावा.सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या माध्यमातून आरक्षण स्थगिती उठवावी अशी विनंती केलेली आहे.


           या वेळी बापूसाहेब भाकरे,गुंडादादा खटकाळे,अरविंद केदार,अजय सिंह इंगवले,प्रताप इंगोले, ऍड गजानन भाकरे,अण्णासाहेब मेटकरी,वैभव केदार, ,इंजि रमेश जाधव,इंजि.भोसले,प्रविण मराळ,महेश नलवडे,सोमेश यावलकर,निसार तांबोळी, पत्रकार सीमा इंगोले,सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते,आणि शिवप्रेमी मंडळ सांगोलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages