Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवामृत दूध संघाचे आरोग्यवर्धक व आकर्षक पेढा पॅकिंग सुरू

शिवामृत दूध संघाचे आरोग्यवर्धक व आकर्षक पेढा पॅकिंग सुरू

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अकलूज दि.१७(क.वृ.): शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे दुध पेढा, केशर पेढा नवीन पॅकिंग व यंत्रणाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, व्हा.चेअरमन ढोपे, संचालक भिलारे, साळुंखे,जाधव, नीलटे, मोरे, मगर, रणवरे, खुडे, आदी उपस्थित होते.

शिवामृत दूध संघाचे विजयनगर डेअरी प्लेटमध्ये दुधावर प्रक्रिया करून महाराष्ट्रातील मोठ मोठ्या शहरांमध्ये पॅकिंग दूध व दही,लस्सी,ताक,श्रीखंड,आम्रखंड पनीर, खवा,बासुंदी,पेढा, फ्लेवर्ड मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचीही निर्मिती करीत आहे. संघाचे दुग्धजन्य पदार्थांना बाजार पेठेतून मागणी वाढत असून ती पूर्ण करण्याचा संघ नेहमी प्रयत्न करीत असतो. सध्या बाजारातून संघाचे पेढ्यास विक्रमी मागणी येत असून, संघाचा पेढा ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. पेढ्याची बाजारातून येणारी मागणी पूर्ण करणे संघास जिकिरीचे झालेले होते. त्यामुळे संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादनांमध्ये यांत्रिकीकरण व स्वयंचलित यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

पेढा उत्पादनासाठी आधुनिक मशिनरी उभारलेली आहेच, त्याचबरोबर पेढा टिकविण्याची क्षमता वाढवण्यासाठी संघाने दिनांक १८ ऑक्टोबर२०२० रोजी पेढा पॅकिंगसाठी आधुनिक मशिनरी उभारून संघाचे मार्गदर्शक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते या मशिनरी मार्फत दुध पेढा,पेढा पॅकिंग सुरू केलेले आहे. त्यामुळे पेढा उत्पादन क्षमता १०० किलो प्रति तास याप्रमाणे २४०० किलो ग्रॅम प्रति दिन पर्यंत गेलेले आहे. आकर्षक पॅकिंग मटेरियलचा वापर करून पेढ्याचे आयुष्य ३० दिवसांनी वाढलेले आहे. संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यापुढे संघाचे सर्वच उत्पादनामध्ये यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण आणण्याचा मानस व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments