Hot Posts

6/recent/ticker-posts

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ महापालिका पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ महापालिका पथकाकडून मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण


मुंबई, दि.६(क.वृ.): ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.

यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रितीने केली जाते त्याविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments